Pashudhan Yojana 2026 : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५ दुधाळ गायी किंवा म्हशी (प्रत्येकी १ लाख, एकूण ५ लाख रुपये , ३ वर्षांचा विमा ६० हजार १८० रुपये, शेड बांधकाम साठी ३ लाख आणि उपकरणांसाठी (कडबाकुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, मिल्कींग मशीन, सोलर इ.) २ लाख ७५ लाख असे मिळून सुमारे ११ लाख ३५ हजार प्रकल्प साहित्य दिले जाणार आहे.
या योजनेत ग्रामीण भागातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, वनहक्क धारक आणि महिला बचत गटांना प्राधान्याने लाभ दिला जातो. पहिल्या टप्प्यात ५० टक्के अनुदानाची रक्कम दिली जाते, तर जनावरांची खरेदी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अनुदान डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा केले जाते. (Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana 2026) Pashudhan Yojana 2026
या योजनेत, सर्वसाधारण प्रवर्गाला ५० टक्के आणि अनुसूचित जाती-जमातींना ७५ टक्के अनुदान मिळते. तसेच दिव्यांगांसाठी ५ टक्के आणि महिलांसाठी ३० टक्के आरक्षण असून, या योजनेमुळे लाभार्थींना दुग्ध व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळवून उद्योजक होण्याची संधी मिळणार आहे. (Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojakta Yojana 2026) Pashudhan Yojana 2026
तर, या योजनेचे ऑनलाइन अर्ज मागविले जाणार की ऑफलाइन अर्ज घेतले जाणार या बाबत शेतकरी वर्गामध्ये संभ्रम होता परंतु आता तो दूर झाला आहे. कारण, आज माननीय आयुक्त, पशुसंवर्धन विभाग यांनी संगितले आहे की, ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना’ चे अर्ज हे महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन मागविले जाणार असून हे अर्ज करण्याची प्रक्रिया ही 01 मे 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 >> सविस्तर माहिती येथे पहा
लवकर अपडेट मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप चॅनल
* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही
* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?
* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६
* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर

