Posted in

Land Registration Fees : शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही | वाटणी पत्र मोफत होणार

Land registration fees details
5/5 - (1 vote)

Land Registration Fees : राज्य सरकारने शेतजमीन वाटणीपत्राच्या नोंदणीवरील फी पूर्णपणे माफ केली आहे. त्यामुळे आता शेतजमिनीचे वाटणीपत्र नोंदणी कार्यालयात नोंदवताना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून सोमवारी दि 20/04/2026 रोजी महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

 

याआधीच्या निर्णयात तहसीलदाराकडे जाऊन कलम ८५ अंतर्गत वाटणी केली तरच नोंदणी फी माफ मिळत होती. मात्र अनेक शेतकरी तहसीलदाराकडे न जाता आपापसात बोलून थेट वाटणीपत्र तयार करायचे आणि नोंदणी कार्यालयात जायचे. अशा शेतकऱ्यांना मात्र नोंदणी फी भरावीच लागत होती. म्हणजेच एकाच प्रकारच्या कामासाठी कोणाला फी माफ तर कोणाला फी भरावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता सुधारित आदेश काढून गैरसमज दूर केला आहे. (Land Registration Fees)

 

दरम्यान, या निर्णयाचा सर्वाधिक फायदा एकाच शेतजमिनीच्या अनेक मालकांना म्हणजेच सहधारकांना होणार आहे. त्यांना जमीन वाटून घेताना वाटणीपत्रावर आता एक रुपयाही नोंदणी फी भरावी लागणार नाही. म्हणजेच कुटुंबातील सदस्यांमध्ये वडील, आई, मुले, भाऊ-बहीण यांच्यात जमिनीची वाटणी झाल्यावर ही फी माफ राहणार आहे. (Land Registration Fees)

 

त्याचबरोबर, वडिलोपार्जित शेतजमिनीचे वारसाहक्काने सर्व वारसांनी मिळून वाटणीपत्र तयार केल्यावरही नोंदणी फी आकारली जाणार नाही. समजा एखाद्या घरात वडिलांची शेतजमीन आहे आणि त्यांच्या निधनानंतर मुलांना ती वाटून घ्यायची आहे, अशा वेळी पूर्वी फी भरावी लागत होती, आता मात्र तीच फी सरकारने पूर्णपणे माफ केली आहे. (Land Registration Fees)

 

 

या निर्णयाचे फायदे?

 

>> नोंदणी फी माफ झाल्यामुळे जमीन वाटणीची प्रक्रिया आता अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद होणार आहे.

 

>> आतापर्यंत नोंदणी फी च्या भीतीने अनेक शेतकरी वाटणीपत्र नोंदवणे टाळत होते किंवा उशीर करत होते, आता तसे होणार नाही.

 

>> शेतकरी वेळेत वाटणीपत्र नोंदवतील त्यामुळे जमिनीचे हक्क स्पष्ट होतील आणि कुटुंबातील वाद कमी होतील.

 

>> भविष्यात जमिनीवरून होणारे कौटुंबिक वाद व न्यायालयीन खटले कमी होण्यास मदत होणार आहे

 

 

 

 

Land Registration Fees letter

 

 

हे पण पहा :

* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”

* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?

* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्‍यांना अर्ज करता येणार नाही?

* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६

* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी खुशखबर

* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी 

* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?

* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?

error: Content is protected !!