Agriculture Drone Scheme : महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान | ड्रोन अनुदान योजना Drone Subsidy Application
राज्यातील शेतकर्यांना पिकांच्या फवारणी (Agriculture Drone Scheme) करिता येणारी प्रमुख अडचण म्हणजे मजूर उपलब्ध असणे. तर, शेतामधील मजूर टंचाई वरती मात करण्यासाठी कृषि मध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. तर, यामध्येच आता पिकांची फवारणी करण्यासाठी ड्रोन चा वापर करण्यात येत आहे. यामुळे, शेतकर्यांच्या शेतावरती अगदी कमी वेळेत फवारणी करणे शक्य झाले आहे.
केंद्र सरकारने याच ड्रोन (Agriculture Drone Scheme) चा वापर वाढवा यासाठी आता नवीन योजना सर्व राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. महिला बचत गटांसाठी आता शासन ड्रोन खरेदी अनुदान देणार आहे. महिला बचत गटांसाठी या योजनेतून 8 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
2024 ते 2026 या कालावधीत देशातील 15 हजार महिला बचत गटांना या केंद्राच्या योजनेच्या माध्यमातून ड्रोन खरेदीसाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. नंतर, हेच ड्रोन महिला बचत गट ह्या (Agriculture Drone Scheme) शेतकऱ्यांना भाडेतत्वार पिकांची फवारणी करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करून देतील, अशी ही योजना केंद्र सरकारने महिला बचत गटांसाठी केली आहे. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांच्या ड्रोन योजनेसाठी 1261 कोटी खर्चाला मंजूरी दिली आहे. तर, ड्रोनमुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी फायदा होईल आणि तसेच त्यांच्या खर्चात, वेळेत बचत होईल.
Agriculture Drone Scheme कशी आहे योजना?
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या योजनेमध्ये ज्या खत कंपन्या आहेत त्या महिला बचत गटांची निवड करतील. त्या गटातील सदस्यांना 15 दिवसांचे ड्रोन प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये 5 दिवसांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण अनिर्वाय आहे आणि तसेच 10 दिवस कीटक नाशक फवारणी प्रशिक्षण देण्यात येईल.
अनुदान किती असेल?
तर, सध्या या ड्रोन ची किंमत ही 10 लाख रुपये आहे यामध्ये महिला बचत गटांना या योजनेद्वारे जास्तीत जास्त 80% किंवा 8 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
ड्रोन द्वारे फवारणी साठी एकरी दर किती आहे?
तर, सध्या उत्तर भारतामध्ये ड्रोन द्वारे एका फवारणी साठी एकरी 300 ते 600 रुपये भाडे आकारले जाते.
अर्ज कोठे आणि कसा करावा?
अनुदान साठी पात्र करण्यासाठी खत कंपनी ही महिला बचत गटांची निवड करनार आहेत तर अद्याप या योजना विषयी सविस्तर मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीयेत. सविस्तर मार्गदर्शक सूचना आल्यानंतर आपल्याला या संकेतस्थळा वरती उपलब्ध करून दिल्या जातील.
अधिक वाचा :
* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस
* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात
* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?
* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा
* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा
* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?
* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश
* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र
* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर