Agricultural Insurance Update : “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र | सोयाबीन पीक विमा 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यातील पावसातील खंडा मुळे पिकाच्या उत्पादनात होणारी घट पाहता जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा (Agricultural Insurance) अग्रिम मंजूर करण्यात आला होता आणि त्याबाबतचे आदेश देखील विमा कंपनी ला देण्यात आले होते. परंतु, नांदेड जिल्ह्यामध्ये यावरती विमा कंपनीने आक्षेप नोंदविले होते परंतु आता नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचा अग्रिम देण्यासाठी विमा कंपनीने तयारी दर्शविली आहे.

Agricultural Insurance Advance Payment Nanded

 

नांदेड जिल्ह्यामध्ये समितीमार्फत पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते तर यामध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी सोयाबीन, कापूस, तूर या पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन ॲडव्हर्सिटी MSA) अधीसूचना/आदेश हा 28 सप्टेंबर 2023 रोजी लागू केली होती.(Agricultural Insurance)

 

 

तर, या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळ हे सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी अग्रिम साठी पात्र ठरविण्यात आले होते. परंतु यावरती कंपनीने आक्षेप घेतला होता.  त्यामुळे परत 19 ऑक्टोबर ला झालेल्या सुनावणी मध्ये प्रत्यक्षात आपुर्‍या पावसामुळे उत्पादनात घट झाल्याची माहिती मांडण्यात आली. त्यावेळी, या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सोयाबीन पिक हे अग्रिम साठी विमा कंपनीने मान्य केले.

 

 

तर, आता नांदेड जिल्ह्यातील सर्व च म्हणजे एकूण 93 महसूल मंडळ मधील सर्व सोयाबीन पीक विमा (Agricultural Insurance) भरलेल्या शेतकर्‍यांना जवळपास एकूण 311 कोटी इतकी रक्कम अग्रिम स्वरुपात मिळणार आहे.

 

पीक विमा अग्रिम 2023 (Agricultural Insurance)

 

जिल्ह्यातील एकूण महसूल मंडळ : 93

अग्रिम साठी पात्र महसूल मंडळ : 93

सोयाबीन पीक विमा धारक : ~ 8.50 लाख

मिळणारी एकूण अग्रिम रक्कम : ~ 311 कोटी रुपये

 

अधिक वाचा :

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

error: Content is protected !!