कृषि तक्रार हेल्पलाइन नंबर वरती 2000 पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी केला संपर्क | तोंडी तक्रार देण्यासाठी साठी “हा” आहे नंबर Agriculture Helpline Number

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Agriculture Helpline Number : कृषि मंत्री यांनी कृषि विभागाचे सचिव, कृषि आयुक्त, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक, सहसचिव आणि इतर अधिकारी यांची मंत्रालयामध्ये  दिनांक 18 जुलै रोजी राज्याचे बैठक घेतली. या बैठकी दरम्यान राज्यामध्ये बोगस बियाणे विक्री बाबत चा प्रश्न उपस्थित करून असे बियाणे विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात येऊन शेतकर्‍यांना त्वरीत न्याय मिळवून देण्याची गरज आहे असे संगितले आहे.

 

agriculture-helpline-number-contact

 

तसेच, शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकां संबंधी तक्रार करण्यासाठी एक व्हॉटसअॅप क्रमांक सुरु करून तो राज्यातील सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात यावा. शेतकऱ्यांनी या व्हॉटसअॅप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनियता ठेवण्यात यावी. तसेच संबंधित जिल्ह्यातील जे भरारी पथकांना मेसेज जाऊन त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना कृषि मंत्री यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या होत्या. (Agriculture Helpline Number)

 

 

तर, त्यानुसार आता कृषि विभाग शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकां संबंधी तक्रार करण्यासाठी एक व्हॉटसअॅप क्रमांक सुरू केला असून शेतकरी हे खालील दिलेल्या क्रमांक वरती तक्रार करू शकतात.

 

कृषि तक्रार व्हॉटसअॅप हेल्पलाइन नंबर : +91 9822446655

 

तर, शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी कृषी आयुक्तालयाने सुरू केलेल्या व्हॉट्सॲप आधारित तक्रार निवारण उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत 2000 जणांनी संपर्क साधला आहे. या हेल्पलाइन वरती कृषि निविष्टा, खते, बियाणे बाबत च्या तक्रारी अपेक्षित असताना इतर तक्रारी येत आहेत. तर, या हेल्पलाइनवर ‘‘शेतकऱ्यांनी फक्त बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत तक्रार असल्यास व्हॉट्सॲपवर लेखी तक्रार करणे अपेक्षित आहे. (Agriculture Helpline Number)

 

 

या हेल्पलाइन नंबर वरती तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱ्याने आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, समस्या किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील साध्या कागदावर लिहावा आणि या कागदाचे छायाचित्र काढून ते व्हॉटस्अॅप हेल्पलाइनवर पाठवावे. (Agriculture Helpline Number)

 

 

तोंडी तक्रारींसाठी हा नंबर

व्हॉट्सॲप हेल्पलाइन नंबर हा संभाषणासाठी किंवा इतर तक्रारींसाठी नाहीये तर, कृषीविषयक अन्य तक्रारींसाठी किंवा संभाषणासाठी १८००२३३४००० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, कृषी आयुक्तालयाच्या तक्रार निवारण कक्षातील ८४४६११७५००, ८४४६२२१७५० किंवा ८४४६३३१७५० या मोबाइल क्रमांकांवर तोंडी तक्रारदेखील करता येतील.

 

 

अधिक वाचा :

* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार

* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना

* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत

error: Content is protected !!