Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी महसूल मंडळांमध्ये मिळणार “या” सवलती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील एकूण ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ (Maharashtra Drought) घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्‍यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले आहे. या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कमी पर्जन्यमान झालेल्या एकूण 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकार कडून घेण्यात आला आहे.

 

Maharashtra Drought

 

तर, राज्यामध्ये 40 तालुके दुष्काळ आणि 1021 महसुली मंडळे ही दुष्काळ (Maharashtra Drought) सदृश परिस्थिति घोषित केली आहे तर या महसुली मंडळे / तालुक्यांमध्ये कोणत्या सवलती मिळणार आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत.

 

 

दुष्काळी मंडळांमध्ये लागू सवलती (Maharashtra Drought)

 

१) शेतकर्‍यांना जमीन महसूलात सूट देण्यात येणार

२) पिक कर्जाचे पुनर्गठन.

३) शेती / पीक कर्जाच्या वसूलीस स्थगिती देण्यात येणार

४) कृषी पंपाच्या चालू विज बिलात ३३.५% सूट देण्यात येणार

५) शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्क माफ करण्यात येणार

६) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

७) आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर करण्यात येणार

 

तर वरील प्रमाणे सवलती ह्या दुष्काळी जाहीर करण्यात आलेल्या महसुली मंडळा मध्ये लागू करण्यात येणार आहेत. तर वरील सवलती मुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे परंतु आता या दुष्काळी जाहीर करण्यात आलेल्या मंडळामध्ये आर्थिक मदत किती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आणि लवकरच शासन यावरती निर्णय घेईल.

 

 

दुष्काळी महसूल मंडळे यादी : पहा

 

 

दुष्काळी तालुके यादी : पहा

 

अधिक वाचा :

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

error: Content is protected !!