Gudhipadva : गुढीपाडव्याला गूळ आणि कडुलिंब मोहर का खातात? काय आहे महत्त्व?
Gudhipadva : प्रथमता सर्व शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर, मित्रांनो आपण पाहत असाल की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गूळ आणि कडूलिंबाचा मोहर किंवा पाला हे खाण्यास दिले जाते. तर हे का दिले जाते आणि याचे काय महत्व आहे हे आपण या ठिकाणी पाहुयात.
गुढीपाडवा (Gudhipadva) हा हिंदवी नववर्षाचा पहिला सण आहे. या दिवशी अनेक शुभकार्यांची सुरूवात केली जाते. महाराष्ट्रात गुढी उभारून त्याची पूजा केली जाते. या दिवशी घरामध्ये सर्वांना गूळ आणि कडूलिंबाचा मोहर किंवा पाला हे खाण्यास दिले जाते. तर ही प्रथा का आहे याचा विचार केला आहे का? कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा पूर्वजांच्या काळापासून चालत आलेली आहे. गूळ आणि कडुलिंब खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे डॉक्टरांचे देखील मत आहे.
कडुलिंब आणि गूळ का खातात? Gudhipadva
आयुर्वेदा नुसार पाहिल्यास चैत्र महिन्यापासून हवामानात बरेच बदल होत असतात आणि त्यामुळे अनेक हंगामी आजार होण्याची शक्यता असते तर कडुनिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत जे शरीराला केवळ सौंदर्यच लाभ देत नाहीत तर आरोग्यालाही लाभ देतात.
तसेच उन्हाळ्या मध्ये त्वचेशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो आणि कडुनिंब त्याची शक्यता कमी करण्यास मदत करते. तसेच कडूलिंबातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीर निरोगी ठेवतात. Gudhipadva तर, गूळ खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि गुळातील खनिजे, कर्बोदके आणि पोषक घटक हवामानातील बदलामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांशी लढण्यास मदत करतात. तर, मित्रांनो त्यामुळे कडुलिंब-गूळ खा आणि निरोगी राहा.
अधिक वाचा :
* या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता
* रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ
* नवीन पद्धतीने कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा
* आचारसंहिता लागू असल्याने कृषि यांत्रिकीकरण घटकासाठी पूर्वसंमती मिळणार का?
* शेतकर्यांनो सावध रहा, कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक