Kusum Solar Scheme 2023 : सोलर पंप चा जिल्हानिहाय कोटा वाढविण्यात येणार | कुसुम सोलर पंप योजना | जिल्हानिहाय प्राप्त ऑनलाइन अर्ज संख्या?
सध्या कुसुम सोलर पंप साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू आहे. परंतु, पोर्टल Kusum Solar Scheme 2023 वर एकाच वेळी राज्यातील अनेक शेतकरी हे अर्ज सादर करत असल्यामुळे संकेतस्थळ वरती भार येऊन सर्वर डाउन ची समस्या येत आहे.
परंतु, ज्या शेतकरी बांधवांचे ऑनलाइन अर्ज सादर झालेले नाहीयेत त्यांनी घाबरून जायची गरज नाहीये कारण आता सर्वांना सोलर पंप मिळणार आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा सोलर पंप कोटा हा वाढविण्यात येणार आहे. Kusum Solar Scheme 2023
‘‘‘मेडा’च्या कुसुम योजनेला (Kusum Solar Scheme 2023) शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळे एकाच वेळी अनेक शेतकरी ऑनलाइन अर्ज दाखल करत आहेत. परिणामी, संकेतस्थळ संथ होऊन अर्ज दाखल होण्यास विलंब होत आहे. इच्छुक सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून दररोज संकेतस्थळाचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांची वाढती मागणी पाहता जिल्हानिहाय कोटा वाढविण्यात येत आहे,’’ अशी माहिती ‘महाऊर्जा’चे महासंचालक श्री रवींद्र जगताप यांनी दिली आहे.
तर, सर्व जिल्ह्यांचा सोलर पंप कोटा हा लवकरच वाढविण्यात येणार आहे. जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. Kusum Solar Scheme 2023
कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत 23584 अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल केले आहेत. या योजनेमध्ये सर्वसाधारण गटासाठी 90%, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 95% अनुदान देण्यात येत आहे.
जिल्हानिहाय प्राप्त अर्ज संख्या
कुसुम सोलर पंप 2023 मध्ये ऑनलाइन पद्धतीने जिल्हानिहाय प्राप्त अर्ज संख्या खालील प्रमाणे आहे.
जिल्हानिहाय अर्ज संख्या | |
जिल्हा | अर्ज |
पुणे | 2602 |
सांगली | 1820 |
नाशिक | 1769 |
सोलापूर | 1450 |
नगर | 1419 |
सातारा | 1369 |
धुळे | 1233 |
यवतमाळ | 1140 |
नंदुरबार | 1036 |
नांदेड | 952 |
जालना | 919 |
हिंगोली | 907 |
जळगाव | 896 |
लातूर | 826 |
छत्रपती संभाजी नगर | 779 |
वाशीम | 773 |
बुलडाणा | 735 |
परभणी | 731 |
बीड | 696 |
धाराशिव | 500 |
भंडारा | 420 |
अकोला | 272 |
कोल्हापूर | 158 |
गोंदिया | 94 |
अमरावती | 61 |
गडचिरोली | 54 |
नागपूर | 30 |
चंद्रपूर | 20 |
पालघर | 8 |
वर्धा | 2 |
रत्नागिरी | 1 |
सिंधुदुर्ग | 1 |
ठाणे | 1 |
रायगड | 1 |
अधिक वाचा :
* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा
* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?
* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर
* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?
* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता