Posted in

Havaman Andaj : राज्यातील काही भागात पुढील ४ दिवस गारपीटीचा इशारा | हवामान अंदाज

Havaman andaj
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

Havaman Andaj : राज्यातील काही भागात पुढील ४ दिवस गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर अनेक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ आणि कोकणातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. 

 

आज दिनांक 22/04/2026 रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, सांगली आणि सातारा जिल्ह्यात शुक्रवारीही गारपीटीचा अंदाज देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उद्या आणि शुक्रवारीही काही भागात वादळी पावसासह गारपीटीचा अंदाज देण्यात आला आहे. Havaman Andaj

 

तसेच, आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, जळगाव तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाजही देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदूरबार, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. Havaman Andaj

 

उद्या दिनांक 23/04/2026 पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.

 

दिनांक 24/04/2026 वार शुक्रवारी पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, बीड, लातूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर नाशिक, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा तर अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. Havaman Andaj

 

दिनांक 25/04/2026 वार शनिवारी पुणे, सातारा, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर सोलापूर, बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

 

तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारीही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.Havaman Andaj

 

रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. Havaman andaj

 

हे पण पहा :

* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही

* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”

* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?

* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्‍यांना अर्ज करता येणार नाही?

* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६

* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी खुशखबर

* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी 

* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?

* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?

error: Content is protected !!