नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ | MahaDBT NSMNY Namo Shetkari Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

राज्यातील शेतकर्‍यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजने च्या निकषा नुसार आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान MahaDBT NSMNY निधि योजना राज्यामध्ये राबविण्याचे ठरवले आहे. त्यानुसार या योजनेचे नवीन संकेतस्थळ तयार करण्यात आले असून या संकेतस्थळवरती लाभार्थी आपले स्टेटस चेक करू शकतील.

 

MahaDBT NSMNY Namo Shetkari Yojana

 

महाराष्ट्र शासन द्वारे केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील  (MahaDBT NSMNY) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत. तसेच, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पहिला हफ्ता हा दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.

 

 

नमो शेतकरी महासन्मान निधि योजना या संकेतस्थळावरती राज्यातील लाभार्थी शेतकरी हे आपल्या हाफत्या बाबतची सद्यस्थिती पाहू शकतील. तर, यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपले स्टेटस चेक करता येईल.

 

 

लाभार्थी हफ्ता स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या :

 

लाभार्थी स्टेटस चेक करा

 

लाभार्थी लॉगिन

 

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बद्दल MahaDBT NSMNY

 

देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (Namo Shetkari Yojana) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

 

आता महाराष्ट्र राज्य सरकार हे देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील  (Namo Shetkari Yojana) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत.

 

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी च्या निकषानुसार च ही योजना राज्यात राबविली जाणार आहे त्यामुळे या योजनेला राज्या मध्ये “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” (Namo Shetkari Yojana) असे नाव देण्यात आले आहे.

 

या योजनेसाठी कोण असणार पात्र?

 

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे पात्र लाभार्थी आहे, त्याच शेतकर्‍यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Yojana) या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

योजनेचा लाभ कसा मिळणार?

 

पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मध्ये पात्र शेतकर्‍यांना दर 4 महिन्यांच्या अंतरानं रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे म्हणजेच वर्षात एकू तीन हफ्ते शेतकर्‍याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. लाभार्थी शेतकरी यांना एकूण वर्षाला रु. 6000/- मिळणार आहेत.

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता कधी मिळणार?

 

पात्र शेतकर्‍यांना पहिला हप्ता हा ऑक्टोबर मध्ये बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.

 

हे केले तरच मिळेल सन्मान निधीचा हप्ता

 

ज्या शेतकरी लाभार्थींनी त्यांचे आधार हे बॅंक खात्याशी सलंग्न केलेले नाही, त्यांनी तत्काळ आधार, मोबाइल क्रमांक हे बँक खात्याशी सलग्न करून घ्यावे कारण, मे अखेरीस किंवा जुलै महिन्यामध्ये मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

 

‘नमो शेतकरी महासन्मान निधि योजना’ साठी बंधनकारक बाबी?

 

  • 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच या योजनेत पात्र असेल
  • हा सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी e-kyc करावी
  • लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती देणे आवश्यक
  • बँक खात्याला आधार,मोबाइल नंबर लिंक करून घेणे बंधनकारक असेल

 

 

लाभार्थी हफ्ता स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या :

 

लाभार्थी स्टेटस चेक करा

 

लाभार्थी लॉगिन

 

 

error: Content is protected !!