MahaDBT Seed Subsidy: महाडीबीटी बियाणे अनुदान साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत | खरीप हंगाम 2023 अनुदानित बियाणे वितरण
महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Seed Subsidy) द्वारे खरीप हंगाम 2023 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे बियाणे वितरण साठी अर्ज मागविले जात आहेत.
महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Seed Subsidy) वर खरीप पिकांचे अनुदानावरती बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी सध्या अर्ज स्वीकारणे सुरू असून जे इच्छुक शेतकरी आहेत ते महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज सादर करू शकता.
महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) वर सोयाबीन, मूग, तूर, उडीद, मका, इत्यादी पिकांच्या बियाणे करिता अर्ज सादर करू शकता.
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 28 मे असून निवड यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी इच्छुक शेतकरी पोर्टलवर अर्ज सादर करू शकतात. निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्त झालेले अर्ज अनुदानित बियाणे वितरण साठी विचारात घेतले जाणार नाहीत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. (MahaDBT Seed Subsidy)
तर महाडीबीटी(mahadbt) वरील अनुदानित बियाणे सोडत यादी (mahadbt lottery list) प्रसिद्ध होण्यापूर्वी इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान साठी अर्ज सादर करावेत.
उपलब्ध बियाणे | सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी,भात इ., |
ऑनलाइन अर्ज घेण्यास सुरुवात | १५ मे २०२३ |
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत | २८ मे २०२३ |
बियाणे सोडत यादी | १-३ मे दरम्यान |
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ |
अधिक वाचा :
* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा
* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?
* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर
* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?