Majhi Ladki Bahin Yojana Online Application : माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू | असा करा 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित पवार (Majhi Ladki Bahin Yojana Online Application) यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. तर या योजनेतून राज्यातील महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जाणार आहेत.
या साठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे सुरू झाले आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी अर्ज नमूना फॉर्म भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म हा अंगणवाडी/तहसील कार्यालयामध्ये मध्ये सादर करावयाचा आहे. (Majhi Ladki Bahin Yojana Online Application) ऑफलाइन अर्ज येथे डाऊनलोड करा
तर, ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला फक्त मोबाइल वरती नारी शक्ति दूत हे मोबाइल अॅप्लिकेशन इंस्टॉल करून आवश्यक कागदपत्रे ही अपलोड करून सादर करावयाचा आहे. तर, ऑनलाइन पद्धतीने आपण घरबसल्या 5 मिंनिटांमध्ये ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. परंतु, त्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
आवश्यक कागदपत्रे (Majhi Ladki Bahin Yojana Online Application)
1.आधार कार्ड
2.अधिवास/जन्म प्रमाणपत्र/रेशन कार्ड/मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचा दाखला
3.उत्पन्न प्रमाणपत्र/पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
4.अर्जदाराचे हमीपत्र (येथे डाऊनलोड करा)
5.बँक पासबूक
6.अर्जदाराचा फोटो
असा करा ऑनलाइन अर्ज
1. अगोदर नारी शक्ति मोबाइल अॅप्लिकेशन हे डाउनलोड करा
नारी शक्ति दूत (Naari Shakti Doot) डाऊनलोड करा
2. त्यानंतर आपला मोबाइल क्रमांक टाकून नोंदणी करा
3. पुढे आपण आपली प्रोफाइल पूर्ण करा
4. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर क्लिक करून अर्ज भरून घ्या
5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
6. आणि शेवटी माहिती जतन करा वर क्लिक करा.
तर, वरील प्रमाणे आपण ऑनलाइन अर्ज सादर करू शकता
Majhi Ladki Bahin Yojana Online Applications, nari shakti mobile application, naarishakti doot app, ladki bahin yojana,