PoCRA Villages: पोकरा योजना केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी …. | PoCRA Scheme Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

PoCRA Villages: राज्यामध्ये पोकरा योजनेची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त गावांतील शेतकऱ्यांना तिचा लाभ व्हावा आणि तसेच राज्यातील प्रत्येक गावात पोकरा योजना लागू करावी, असे आमचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री यांनी आज दिनांक 25 जुलै रोजी विधानपरिषदेत दिली आहे.

 

pocra-villages 

 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA Villages) महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 4682 गावे, जळगाव जिल्ह्यातील 460 गावे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 142 गावे अशा एकूण 5220 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

 

 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA Villages) चा दूसरा टप्पा हा कार्यान्वित करून त्यामध्ये विदर्भातील उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

तर, पोकरा 2.0 मध्ये विदर्भातील नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या जिल्ह्यातील गावांची यादी ही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून ही योजना या जिल्ह्यांमध्ये 2024 पासून सुरू करण्याची शक्यता आहे.

 

 

ग्रामीण भागात शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना ही राज्यामध्ये अत्यंत फायदेशीर ठरली आहे ही योजना केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे आणि भविष्यात यादृष्टीने आवश्यक ते निर्णय घेतले जातील अशी माहिती कृषि मंत्री यांनी विधानपरिषदेत दिली.

 

 

अधिक वाचा :

* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार

* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना

* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत

* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा

error: Content is protected !!