Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू | आता महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. तर या योजनेतून राज्यातील महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जाणार आहेत.
या योजनेनुसार, राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती मध्ये सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आलीय.
योजनेत मिळणारा लाभ? Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
या योजने अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होतील.
कोणाला मिळणार लाभ?
21 ते 60 वर्षे या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल
लाभ मिळण्यासाठी काय आहे अट?
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवे. या योजनेसाठी 46 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय.