PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान/नमो योजना आता बाह्य यंत्रणा मार्फत….
PM Kisan Samman Nidhi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये दि.०१.०२.२०१९ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाना रु.२०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात रु.६०००/- प्रति वर्षी लाभ देण्यात येतो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या प्रति वर्ष, प्रति शेतकरी रु.६०००/- या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रु.६०००/- इतक्या निधीची भर घालणारी “नमो शोतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. तथापि, किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने, स्वयंनोंदणीकृत लाभार्थींना मान्यता प्रदान करणे, पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई-केवायसी प्रमाणिकरण, बँक खाती आधार संलग्न करणे व भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे, स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणीअंती मान्यता प्रदान करणे/नाकारणे याबाबी प्रलंबित असल्याने, केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. (PM Kisan Samman Nidhi)
सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता, तसेच, क्षेत्रिय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेले पदे विचारात घेता, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या ४११ मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणद्वारे उपलब्ध करुन घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती पत्रान्वये संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी केली होती. (PM Kisan Samman Nidhi)
सदर विनंतीस अनुसरुन सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास, मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्या उपसमितीच्या दि. १०.१०.२०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या ४११ मनुष्यबळाच्या सेवा, बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे ४११ मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. (PM Kisan Samman Nidhi)
तर, आता प्रत्येक जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर एक संगणक चालक हा बाह्ययंत्रणे मार्फत नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या योजनेची अमलबजावणी सोयिस्कर होणार अशी अपेक्षा आहे.
नियुक्त करण्यात येणारी पदसंख्या खालील प्रमाणे (PM Kisan Samman Nidhi) :
Tags : pm kisan, pm kisan status, pm kisan samman nidhi, pm kisan beneficiary status, pm kisan yojana, pm kisan status check 2024, pm kisan ekyc,
* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..
* 16 डिसेंबर पासून राज्यात “अग्रिस्टॅक” योजना होणार सुरू
* हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत
* आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती
* जुलै ते सप्टेंबर 2024 अतिवृष्टी मदत वाटप सुरू…… असे चेक करा आपले पेमेंट स्टेटस
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे
* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर
* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी
* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार