PoCRA MahaDBT : आता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प मध्ये असलेल्या गावातील शेतकर्‍यांना महाडीबीटी पोर्टल वर करता येणार अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PoCRA MahaDBT : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA) हा राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 4682 गावे, जळगाव जिल्ह्यातील 460 गावे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 142 गावे अशा एकूण 5220 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

 

PoCRA MahaDBT

 

परंतु, या गावातील शेतकर्‍यांना शासनाच्या महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर अर्ज करण्यास मुभा नव्हती त्यामुळे या गावातील शेतकरी हे महाडीबीटी पोर्टल PoCRA MahaDBT वरील असलेल्या शेतकरी योजनांपासून वंचित राहत होते. त्यामुळे काही शेतकरी यांनी कृषि अधिकारी यांच्याकडे याविषयी तक्रारि दाखल केल्या होत्या.

 

 

तर, याबाबत ची दाखल घेत अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी कृषि आयुक्त यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाअंतर्गत गावातील शेतकर्‍यांना कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल PoCRA MahaDBT वर अर्ज करण्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत च्या सुचना दिल्या आहेत.

 

 

तर, आता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाअंतर्गत गावातील शेतकरी हे प्रकल्पातील योजना सोबतच कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल PoCRA MahaDBT वरील योजनांसाठी अर्ज करू शकतील.

 

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल : नोंदणी आणि योजना अर्ज प्रक्रिया साठी येथे पहा

 

 

Pocra MahaDBT बाबतचे पत्र : 

 

pocra mahadbt

 

 

अधिक वाचा :

* PoCRA Notice तातडीने हे काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार

* या जिल्ह्यातील 41 मंडळ मध्ये 25% अग्रिम मंजूर

* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प साठी 116 कोटी निधि प्राप्त

* पीएम किसान योजना “या” तारखेपर्यंत e-Kyc पूर्ण करा

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी सप्टेंबर 2023

* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान

* भूमी अभिलेख चे नवीन संकेतस्थळ सुरू

error: Content is protected !!