Fertilizer Subsidy : राज्यातील “या” शेतकर्‍यांना होणार फायदा | फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान | पहा किती मिळणार खतांसाठी अनुदान?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fertilizer Subsidy : सन 2023 मध्ये राज्यामध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज सुरू झाले आहेत. तसेच, राज्याचे कृषि मंत्री यांनी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना फळबागे साठी आवश्यक खतांसाठी 100% अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

fertilizer-subsidy

 

खतांसाठी 100% अनुदान (Fertilizer Subsidy)

 

तर, राज्यामध्ये चालू वर्षात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राबविणे सुरु आहे परंतु या योजनेमध्ये शेतकर्‍यांना फक्त खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, नांग्या भरणे आणि पीक संरक्षण या बाबी साठी अनुदान देण्यात येत होते. परंतु, यामध्ये फळबागे साठी जे खते लागतील ती लाभार्थ्याने स्वखर्चाने करण्याचे प्रस्तुत होते परंतु आता या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना खतांसाठी अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती ही कृषि मंत्री यांनी दिली आहे. Fertilizer Subsidy

 

 

कोणाला मिळणार लाभ?

 

जे शेतकरी महाडीबीटी पोर्टल वर फळबाग घटकासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करतील आणि ज्यांची स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत ऑनलाइन सोडत मध्ये निवड होईल त्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांना (Fertilizer Subsidy) खतांसाठी 100% अनुदान देण्यात येईल.

 

 

खतांसाठी अनुदान किती मिळणार?

 

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत यापूर्वी आर्थिक मापदंडामध्ये खतांचा समावेश नव्हता आता खतांचा समावेश करून नवीन आर्थिक मापदंड हे कृषि आयुक्तालय यांच्याकडून लवकरच तयार करण्यात येतील. 

 

परंतु सध्या रोजगार हमी योजना अंतर्गत मापदंडा प्रमाणे खतांचा वापर विचारात घेतला असता अंदाजे जवळपास हेक्टरी 20 हजार रुपये (तीन वर्षांसाठी) हे खतांसाठी अनुदान शेतकर्‍यांना मिळू शकते.  (फळपीक/लागवड अंतर/कलमे संख्या नुसार यामध्ये बदल होऊ शकतो)

 

योजनेबद्दल अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

 

अधिक वाचा :

* भूमी अभिलेख चे नवीन संकेतस्थळ सुरू

* सोयाबीन पिवळा मोझ्याक रोगाचे असे करा व्यवस्थापन

* ज्या शेतकर्‍यांना हफ्ता आला नाही त्यांनी लवकर “हे” काम करा

* असा करा सोलर पंप चा सेल्फ सर्वे, स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती

* कुसुम सौर पंप साठी भरलेल्या अर्जाना येत आहे “हा” ऑप्शन

error: Content is protected !!