PoCRA Phase 2 : 1 एप्रिल पासून टप्पा 2 चे काम होणार सुरू | पोकरा प्रकल्प टप्पा 2
PoCRA Phase 2 : जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रकल्पात राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली तर विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेशातील जळगाव व नाशिक अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित 6000 कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यात येणार आहे. (PoCRA Phase 2)
तर या २१ जिल्ह्यातील ७१९८ गावांच्या निवडीस शासन निर्णय अन्वये मान्यता मिळालेली आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी/ कर्मचारी (विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक) यांचेमार्फत करावयाची आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ बाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी या प्रकल्पामध्ये समाविष्ट मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील २१ जिल्ह्यांतील ७ हजार १९८ गावांच्या ४ हजार ९२६ सरपंचांना प्रकल्प क्षेत्रातील १६ केंद्रांवर यशदातील तज्ज्ञ प्रशिक्षण देत आहेत. (PoCRA Phase 2)
पुढील दोन महिन्यांत सरपंचांचे प्रशिक्षण पूर्ण होईल. या प्रशिक्षणात बदलत्या हवामान स्थितीत गावांना तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरपंचांची भूमिका व कृती कार्यक्रम यावर भर देण्यात येणार आहे. तसेच, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 01 एप्रिल पासून प्रकल्पातील कामे सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. (PoCRA Phase 2)
दुसर्या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी
पोक्रा 2.0 गावे यादी : 14-10-2024 शासन निर्णय
* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता
* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार
* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज
* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?
* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस
* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…
* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?
* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती