Soyabin Kapus anudan : या शेतकर्यांना मिळणार रु. 20,000/- अनुदान | सोयाबीन व कापूस अनुदान शासन निर्णय
Soyabin Kapus anudan : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. आणि अनुदान वितरण साठी पोर्टल तयार करण्यात येऊन वितरणाची कार्यवाही सुरू आहे.
राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा.मंत्रिमंडळाच्या दि.११ जूलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.
राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी अँप/पोर्टलट्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र राहणार आहेत आणि ई-पीक पाहणी अँप/पोर्टल वर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
या शेतकर्यांना मिळणार रु. 20,000/- अनुदान? (Soyabin Kapus anudan)
या योजना अंतर्गत शेतकर्यांना प्रती पीक 2 हे मर्यादेत अनुदान देय असणार आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांचे कापूस आणि सोयाबीन असे दोन्ही यादीत नाव आहे त्या शेतकर्यांना कापूस पिकासाठी 2 हे पर्यन्त आणि सोयाबीन पिकासाठी 2 हे पर्यन्त लाभ मिळू शकतो म्हणजेच त्यांना दोन्ही पिकांसाठी 4 हे मर्यादेत एकूण 20,000/- रुपया पर्यन्त लाभ मिळू शकतो.
हे पण पहा :
* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस
* “या” तारखेपासून शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान
* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज
* महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना
* सोयाबीन पिवळे पडतेय? मग असे करा एकात्मिक व्यवस्थापन | सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस)