Soybean Cotton Value Chain : रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर | मूल्य साखळी विकास विशेष कृती योजनेला ५०० कोटींचा अतिरिक्त निधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3/5 - (4 votes)

Soybean Cotton Value Chain : राज्यामध्ये सोयाबीन कापूस व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना राबविली जात आहे. तर, या योजने अंतर्गत खरीप हंगाम मध्ये शेतकर्‍यांना महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून फवारणी पंप, नॅनो डीएपी , युरिया, कापूस साठवणूक बॅग, हे 100% अनुदान वरती देण्यात आले. त्यानंतर आता परत या योजना मध्ये रब्बी हंगाम साठी अतिरिक्त 500 कोटी चा निधि मंजूर करण्यात आला आहे. 

 

Soybean Cotton Value Chain

 

 

महाराष्ट्रातील शेतक-यांची उत्पादकता वाढावी, त्याचप्रमाणे या पिकांच्या मूल्यसाखळीमध्ये शेतक-यांचा सहभाग वाढावा या दृष्टीकोनातून कापूस, सोयाबीन तसेच, भुईमूग, सुर्यफूल, करडई, मोहरी, तीळ व जवस या अन्य तेलबिया या पिकांच्या उत्पादकता वाढी बरोबरच मूल्य साखळी विकासासाठी आगामी ३ वर्षासाठी (सन २०२२-२३ ते सन २०२४-२५) रु.१००० कोटी खर्चाची विशेष कृती योजना राबविण्यास दि.१२ मे, २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत कापूस पिकासाठी रु.४५० कोटी व सोयाबीन पिकासाठी रु.५५० कोटीचा कार्यक्रम ३ वर्षासाठी विहित करण्यात आला आहे. (Soybean Cotton Value Chain)

 

 

 

मा.मंत्री कृषि यांनी कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना ही ३ वर्षासाठी राबविण्याचे ठरले होते. सदर १०००.०० कोटी रुपयांच्या योजनेचे हे अंतिम वर्ष आहे. चालू खरीप हंगाम संपला म्हणजे ही योजना संपते. सदर राज्य योजनेचा विस्तार करून त्यात रब्बी पिके समाविष्ठ करून त्यांना नॅनो खते, पी.डी.के.व्ही. उत्पादीत सोलर ट्रॅप, स्प्रे पंप देता येतील. सदर कार्यक्रम राबविण्यासाठी ५०० कोटी इतक्या अतिरिक्‍त निधीची आवश्‍यकता भासणार आहे, या व्यतिरिक्त सदर उद्दिष्टे पूर्ण करणारी कोणतीही राज्य पुरस्कृत योजना विभागात नाही. त्याअनुषंगाने मंत्रीमंडळामध्ये प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा, असे निर्देश दिले होते. (Soybean Cotton Value Chain)

 

 

तसेच, मा.मुख्य सचिव यांच्या टिप्पणी अन्वये दि.२३ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या मा.मंत्रीमंडळ बैठकीच्या कार्यवृत्तातील निर्णयाच्या अनुषंगाने दि.२३ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेसाठी रु.५०० कोटी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्याबाबत या विषयावर मा.मंत्रिमंडळाने चर्चा केली आणि त्याबाबत निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. (Soybean Cotton Value Chain)

 

 

त्यानुसार, कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठीच्या विशेष कृती योजनेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पिय तरतुदी व्यतिरिक्त रब्बी पिकांकरिता नॅनो खत, पीडीकेव्ही उत्पादित सोलार ट्रॅप, स्प्रे पंप, तसेच, कापूस पिकासाठी पिक संरक्षण औषधे, सोयाबीन पिकासाठी स्पायरल ग्रेडर, बहुपिक मळणी यंत्र, सोयाबीन कापणी यंत्र इत्यादी बाबींच्या अंमलबजावणीस व त्याकरीता रु. ५०० कोटीचा अतिरिक्‍त निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

 

तर, आता लवकरच कृषि विभागा मार्फत महाडीबीटी पोर्टल वर या घटकांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही होण्याची शक्यता आहे. तर आता राज्यातील शेतकर्‍यांना खरीप हंगाम प्रमाणेच आता नॅनो डीएपी, युरिया खत, पीडीकेव्ही उत्पादित सोलार ट्रॅप, स्प्रे पंप, तसेच, कापूस पिकासाठी पिक संरक्षण औषधे, सोयाबीन पिकासाठी स्पायरल ग्रेडर, बहुपिक मळणी यंत्र, सोयाबीन कापणी यंत्र हे मिळणार आहेत.

 

 

या घटकांचा लाभ मिळणार ? (Soybean Cotton Value Chain)

 

नॅनो डीएपी, युरिया खत,

पीडीकेव्ही उत्पादित सोलार ट्रॅप,

स्प्रे पंप,

कापूस पिकासाठी पिक संरक्षण औषधे,

सोयाबीन पिकासाठी स्पायरल ग्रेडर,

बहुपिक मळणी यंत्र,

सोयाबीन कापणी यंत्र

 

ऑनलाइन अर्ज ?

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर ऑनलाइन अर्ज स्वीकारणे लवकरच सुरू करण्यात येतील.

 

शासन निर्णय येथे पहा

 

 

हे पण पहा :

 

* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू

* शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर

* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?

* अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी? Soyabin Kapus anudan ekyc

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू

* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

 

 

Tags : Soybean Cotton Value Chain, soyabin_cotton_value_chain_scheme, battery_spray_pump_krushivibhag, cotton_storage_bag_krushivibhag, nano_dap_urea, nano_urea, iffco_nano_dap_urea, 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!