Crop Insurance : उर्वरित पीक विमा अग्रिम रक्कम 4 दिवसांत जमा करा ….अन्यथा कंपनी वर कारवाई | कृषि आयुक्त यांचा आदेश
Crop Insurance : महाराष्ट्र राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यातील पावसातील खंडा मुळे पिकाच्या उत्पादनात होणारी घट पाहता जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा अग्रिम मंजूर करण्यात आला आहे आणि पीक विमा अग्रिम शेतकर्यांना वितरित करण्याबाबतचे आदेश देखील विमा कंपनी ला संबंधित जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत.
पीक विमा Crop Insurance
चालू वर्षी खरीप हंगामातील पीक नुकसानापोटी राज्य शासनाने पीक विमा कंपन्यांना अग्रीम पीक विमा Crop Insurance देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 1954 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास मान्यता आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत पीक विमा कंपनीने 1036 कोटी रक्कम च शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली आहे. अजून ही 1019 कोटी रुपये थकीत असून ती अग्रिम रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, असे आदेश हे राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिला आहे.
तर, 1019 कोटी रुपयांची नुकसानभरपाई ही येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास संबंधित कंपन्यांवर कारवाई करू, असा इशारा कृषि आयुक्त यांनी विमा कंपन्यांना दिला आहे.
राज्य शासनाने एकूण 24 जिल्ह्यात अग्रीम रक्कम देण्याच्या आदेश दिलेले आहेत. त्यांपैकी 9 जिल्ह्यातील विमा कंपन्यांनी पीक विमा Crop Insurance देण्याबाबत अंशतः आक्षेप नोंदविले आहेत आणि या आक्षेपांच्या अपीलावरील सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर पीक विमा रक्कम व शेतकरी लाभार्थी संख्येत आणखी बरीच मोठी वाढ होणार आहे. तर, या 9 जिल्ह्यातील शेतकर्यांना सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अग्रिम वाटपाचा मार्ग मोकळा होईल.
अधिक वाचा :
* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात
* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?
* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा
* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा
* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?
* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश
* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र
* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर
* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24