Sugarcane Harvester Lottery : महाडीबीटी ऊस तोडणी यंत्र सोडत यादी 2024 | सर्व जिल्हयांची सोडत यादी पहा
Sugarcane Harvester Lottery : कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे विविध कृषि यंत्र आणि औजारे यांना अनुदान दिले जाते आणि यामध्ये विविध कृषि यंत्र औजारे जसे की पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. परंतु, आता महाडीबीटी पोर्टल द्वारे ऊसतोडणी यंत्रास देखील अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.
ऊसतोडणी यंत्रा अनुदान शासन निर्णय
राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. २० सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समिती गठित करण्यात आलेली आहे. त्यानुसार मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीची ३२ वी बैठक दि. ११ जानेवारी, २०२३ रोजी पार पडली. या बैठकीमध्ये ऊस तोडणीतील मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी व ऊसाच्या गाळपासाठी होणारा विलंब टाळण्याच्या अनुषगाने सन २०२२- २३ मध्ये ४५० व सन २०२३-२४ मध्ये ४५० अशा एकूण ९०० ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester Lottery) खरेदीसाठी अनुदान देण्याच्या प्रकल्पासाठी रुपये ३२१.३० कोटी एवढ्या प्रकल्प किंमतीस मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन २०२२-२३ व सन २०२३- २४ मध्ये ऊस तोडणी यंत्रास (Sugarcane Harvester Lottery) अनुदान देणे बाबत दि. २०.०३.२०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अल्पावधी शिल्लक असताना सदरचा शासन निर्णय निर्गमित झाल्याने सन २०२२-२३ मधील ४५० ऊस तोडणी यंत्रांचे लक्षांक हे चालू आर्थिक वर्प २०२३-२४ मध्ये वर्ग करून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सन २०२२-२३ मधील ४५० व चालू आर्थिक वर्ष सन २०२३-२४ मधील ४५० अशा एकूण ९०० ऊस तोडणी यंत्रांना (Sugarcane Harvester Lottery) अनुदान देणेबाबतच्या रू.३२१.३० कोटी इतक्या रकमेच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुसार, राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ३२ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या दि.११/०१/२०२३ रोजी झालेल्या बैठकीस अनुसरून कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विकास विभागाचे क्र.संकीर्ण-२०२२/ प्र.क्र.१६८/पार्ट-१/१४-अे, दि.३०/०१/२०२३ चे शासन निर्णय क्रमांकः ससाका-०७२२/प्र.क्र. २१६/२५-स, इतिवृत्तात मंजुरी दिल्याप्रमाणे खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार रूपये ३२१.३० कोटी रकमेच्या प्रकल्प प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. Sugarcane Harvester Lottery
Sugarcane Harvester Lottery
तर, आज दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी ऊस तोडणी यंत्र साठी महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत यादी काढण्यात आली आहे. तर, ही यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून यादी डाऊनलोड करावी.
ऊस तोडणी यंत्र : लॉटरी यादी येथे डाऊनलोड करा
अधिक वाचा :
* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा
* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा
* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज
* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान
* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक
* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान
* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस
* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात
* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?
* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा