Irrigation Scheme : शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी….आता तीन वर्षानी एकाच क्षेत्रावर परत तुषार/ठिबक सिंचनाचा लाभ घेता येणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

राज्य शासनाकडून शेतकर्‍यांना सूक्ष्म सिंचन Irrigation Scheme अंतर्गत तुषार आणि ठिबक सिंचन साठी महाडीबीटी पोर्टल द्वारे अनुदान देण्यात येते. तर या घटकात केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचनाच्या अनुदान वाटप धोरणात महत्त्वाचे बदल केले आहेत. आता शेतकर्‍यांना तुषार संचाचा लाभ घेतल्यानंतर सात ऐवजी तीन वर्षांत पुन्हा सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

Irrigation Scheme Update

 

राज्यातील शेतकर्‍यांना केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि प्रधानमंत्री कृषि सिंचन Irrigation Scheme योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी प्रति थेंब अधिक पीक या उपक्रमासाठी अनुदान देण्यात येते. तर, या योजनेमध्ये पूर्वी एखाद्या शेतकर्‍याने तुषार संचा चा लाभ घेतल्यानंतर पुढील 7 वर्ष त्याच क्षेत्रावर सिंचनाचा लाभ घेता येत नव्हता त्यामुळे शेतकरी हे पुडील 7 वर्ष त्या क्षेत्रावर तुषार/ठिबक साठी अर्ज करू शकत नव्हते. परंतु, आता या योजनेतील ही किचकट बाब हटवून आता 3 वर्षांनंतर शेतकरी त्याच क्षेत्रावर सिंचनाचा लाभ घेऊ शकतील.

 

 

आता एखाद्या शेतात तुषार संचासाठी अनुदान घेतलेल्या शेतकऱ्याला आता 3 वर्षानंतर त्याच क्षेत्रावर ठिबक संच Irrigation Scheme घेण्याकरिता अनुदान देता येणार आहे. परंतु, यामध्ये ठिबक संचाची अनुदानाची परिगणना करताना या पूर्वी तुषार संचासाठी दिलेल्या अनुदानाची रक्कम ठिबकच्या अनुदानातून वजा करून उर्वरित रक्कम ही शेतकऱ्याला मिळणार आहे. तर, आता या बदलामुळे शेतकऱ्याला एकाच क्षेत्रावर पीक पद्धतीत बदल करण्याची संधी मिळाली असून यामुळे ठिबक सिंचना खालील क्षेत्रात वाढ होणार असून खते व पाण्याची बचत होण्यास मदत मिळणार आहे.

 

तुषार / ठिबक अधिक माहिती साठी : भेट द्या

 

 

अधिक वाचा :

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!