Kapus Soyabin anudan : या तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (3 votes)

Kapus Soyabin anudan : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे, मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्‍टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती.

 

Kapus Soyabin Anudan Vitaran (1)

 

तर, या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा.मंत्रिमंडळाच्या दि.११ जूलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. (Kapus Soyabin anudan)

 

 

कृषि विभागाच्या या योजनेमध्ये राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्‍टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य अनुज्ञेय राहणार आहे. (Kapus Soyabin anudan)

 

 

या योजनेमध्ये राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी अँप/पोर्टलट्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र राहतील. Kapus Soyabin anudan

 

 

कधी मिळणार कापूस व सोयाबीन अनुदान रक्कम? (Kapus Soyabin anudan)

 

राज्य सरकारने थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कृषी आयुक्तांच्या नावानं खातं उघडण्यासाठी मान्यता दिली होती. म्हणजे या योजनेसाठी ४ हजार १९४ कोटी रुपयांचा जो निधी देण्यात आला आहे, तर आता अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

 

 

कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वितरण साठी आज रोजी कृषि मंत्री यांनी बैठक घेऊन हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात १० सप्टेंबरपासून जमा करा, अशा सूचना केल्या होत्या. परंतु, अनुदान वाटपात तयार करण्यात आलेल्या पोर्टल वर बर्‍याच तांत्रिक समस्या निर्माण होत होत्या परंतु आता या सर्व तांत्रिक अडचणी सोडवण्यात आल्या आहेत. 

 

 

तर, आता दिनांक 21 सप्टेंबर 2024 पासून शेतकर्‍यांच्या खात्या मध्ये हे अनुदान वितरण सुरू होणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार बँक खात्या शी संलग्न आहे की नाही हे तपासून पहावे. कारण, हे अनुदान आपल्या आधार संलग्न बँक खात्या मध्ये वितरण केले जाणार आहे. 

 

 

पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

 

हे पण पहा :

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू

* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

 

 

error: Content is protected !!