PM Kisan Installment : एकाच कुटुंबातील दोन व्यक्तीना पीएम किसानचा हप्ता मिळतो का? काय आहे नियम?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

PM Kisan Installment : शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधि योजना सुरू केली. 2019 साली केंद्राने सुरू केलेल्या या योजनेत देशातील बरेच शेतकरी याचा लाभ घेत आहेत. दरम्यान सरकारने याचा गैरफायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी काही नियम व अटी लागू केल्या होत्या. त्यानुसार बर्‍याच शेतकरी बांधवाना प्रश्न आहे की एकाच घरातील किंवा कुटुंबातील दोन व्यक्ति लाभ घेऊ शकतात का? तर याच प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

 

Pm Kisan Installment

 

पीएम किसान सन्मान निधि (PM Kisan Installment) योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो. ही रक्कम शेतकऱ्यांना 3 हप्त्यामध्ये वर्षातून विभागून दिली जाते. या योजनेसाठी सरकारने अनेक नियमही केले आहे. परंतु, एकाच कुटुंबातील/ घरात वडील आणि मुलगा, पती पत्नी दोघे पण पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का? अर्ज करत असतील तर एका घरामध्ये वर्षाला बारा हजार मिळू शकतील का? याबाबत जाणून घेणे आवश्यक आहे.

 

 

केंद्र सरकारच्या नियमानुसार एकाच घरातील दोन व्यक्तींना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. ज्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे तिच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. सरकारच्या नियमानुसार ज्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे त्या व्यक्तीला किसान सन्माननिधीसाठी अर्ज करु शकतात. (PM Kisan Installment)

 

 

कुटुंबातील सर्व शेती नावे असलेले सदस्य लाभ घेऊ शकतात का? PM Kisan Installment

 

तर या योजनेमध्ये शेतकरी कुटुंबातील फक्त एकच सदस्य लाभ घेऊ शकतो. यामध्ये कुटुंब म्हणजे पतीपत्नी व 18 वर्षा खालील अपत्य असा होतो. म्हणजे पती पत्नी पैकी कोणताही एक सदस्य हा योजनेचा लाभ घेऊ शकतो.

 

 

 

वडील आणि मुलगा वेगळे रहात असतील तर?

 

यामध्ये वडिल आणि मुलगा (18 वर्षा वरील) वेगळे राहात असतील आणि त्याच्या स्वत:च्या नावावर वेगवेगळी जमिन असेल त्यांना हा लाभ मिळू शकतो.

 

 

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

error: Content is protected !!