Maha DBT : आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
Maha DBT : आता शासनाच्या कुठल्याही योजना (Maha DBT Agriculture Scheme) जसे की शेत पिकांचे अतिवृष्टी नुकसान झाल्यामुळे अनुदान, पीक विमा अनुदान असेल पिक विमा असेल, तसेच बाल संगोपन योजना, निराधार अनुदान राज्य शासन, लाडकी बहीण योजना, केंद्र शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्यांना मानधन अनुदान देणाऱ्या ज्या काही योजना आहेत. या योजनांचा लाभ देण्यासाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे.
तसेच, शासनाने या संदर्भातील एक महत्वाची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. बर्याच वेळा योजनांचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला जातो. योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत अनुदानाचा लाभ (Scheme Subsidy) मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये योग्य त्या लाभार्थ्याला या अनुदानाचा लाभ मिळावा, यासाठी शासनाच्या माध्यमातून डीबीटी सुरू करण्यात आलेली आहे.
आता कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल आधार कार्ड (Aadhar Card Maha DBT), आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. कारण आधार संलग्न बँक खात्यात यापुढे सर्व मदत अनुदान देण्यात येणार आहेत. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राजपत्र निर्गमित करण्यात आले आहे.
त्यामुळे, आता सर्व शासकीय योजना चा लाभ घेण्यासाठी शासनाने आधार आणि आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केले आहे. कारण, पुढे कोणत्याही योजनांचे अनुदान हे तुमच्या आधार संलग्न बँक खात्या मध्ये च वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार हे बँक खात्याशी संलग्न आहे की नाही हे नक्की तपासवे व नसेल तर ते आपल्या आधार शी लिंक करून घ्यावे.
आधार ला कोणते बँक खाते संलग्न (लिंक) आहे हे कसे पहावे? …. आता सर्व शासकीय अनुदान या खात्या मध्ये जमा होणार
Tags : maha dbt, dbt maharashtra, aadhar bank link status, mahadbt farmer schemes, maharashtra government shcemes mahadbt ,
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती
* पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….
* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान