Posted in

Loan Waiver Announcement : राज्यातील ३५ ते ४० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? निकष काय असणार? सरकार शेतकरी कर्जमाफी च्या तयारीत

Loan waiver announcement
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Loan Waiver Announcement : राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा खूप मोठा दिलासा देणारी मोठी योजना राबवण्याची शासन दरबारी तयारी सुरू आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या आधारेच शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल २२ ते २७ हजार कोटी रुपयांचा भार पडण्याची शक्यता आहे. मात्र, लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याने सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. (Loan Waiver Announcement)

 

३५ ते ४० लाख शेतकरी होणार कर्जमाफी साठी पात्र

 

या कर्जमाफी योजनेत सुमारे ३५ ते ४० लाख शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता आहे. 2 लाख रुपयांपर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज हे सरकार भरणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना एक प्रकारे खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

 

कर्जमाफी साठी शासनाने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अध्यक्षपदी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी होते. समितीत वित्त, कृषी आणि सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य बँकेचे प्रशासक यांचा समावेश होता. (Loan Waiver Announcement)

 

या समितीने सुमारे 6 महिन्यांचा सखोल अभ्यास करून आपला अहवाल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. दरम्यान, शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीय दबाव वाढत असल्याने अहवाल येण्यापूर्वीच सरकारने काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते की, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाईल. तसेच, जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल. (Loan Waiver Announcement)

 

 

कर्जमाफीचे नियम काय असणार?

 

या योजनेनुसार, 2 लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार भरून काढणार आहे. मात्र, ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी आधी स्वतःचे कर्ज फेडावे लागेल. त्यानंतरच सरकार त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची मदत देणार आहे. याशिवाय, जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात, त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन प्रामाणिक कर्जफेडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

 

 

नव्या अटी टाळण्याचा निर्णय

 

समितीने कर्जमाफीसाठी काही कठोर अटी लागू करण्याचाही विचार केला होता. यामध्ये यापूर्वी कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना वगळणे, खातेफोड करून लाभ घेणाऱ्यांवर निर्बंध आणणे, तसेच शेती क्षेत्राची मर्यादा ठरवणे अशा उपाययोजनांचा समावेश होता.

मात्र, या अटींना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने कोणत्याही नव्या अटी लागू न करता पूर्वीच्या योजनेप्रमाणेच कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. (Loan Waiver Announcement)

 

हे पण पहा :

* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर

* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार

* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही

* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”

* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?

* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्‍यांना अर्ज करता येणार नाही?

* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६

* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी खुशखबर

error: Content is protected !!