MahaDBT Seeds Application : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे खरीप हंगाम 2026-27 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे अनुदानित बियाणे वितरण साठी ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.
महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) वर खरीप पिकांचे अनुदानावरती प्रमाणित बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी सध्या अर्ज स्वीकारणे सुरू असून जे इच्छुक शेतकरी व शेतकरी गट जे आहेत ते महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज सादर करू शकता. (MahaDBT Seeds Application)
वैयक्तिक शेतकरी हे प्रमाणित बियाणे घटका म्हणजेच 40-50% अनुदान वरील बियाणे करिता अर्ज करू शकतील तर शेतकरी गट हे पीक प्रात्यक्षिक बियाणे म्हणजेच 100% अनुदान वरील बियाणे करिता अर्ज सादर करू शकतील. (MahaDBT Seeds Application)
महत्वाची अपडेट
अपडेट अशी आहे की, या अगोदर ज्या शेतकर्यांनी गतवर्षी बियाणे घटकाचा लाभ घेतला होता म्हणजे ज्यांनी अर्ज केले होते आणि निवड झाली होती त्यांना पोर्टल वर या वर्षी अर्ज करता येत नव्हते कारण, ते अर्ज पोर्टल वर अगोदर असल्याचे दिसत होते परंतु, आता जुने अर्ज हे “Department Cancelled” झाले आहेत तर आता सर्व शेतकरी हे बियाणे घटकासाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील.
परंतु, आज अर्ज करताना खालील प्रमाणे एरर येत आहे. तर, पोर्टल वर याबाबत चे अपडेट चे काम सुरू असून ते सोमवारी दुपार पर्यन्त पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आपण अर्ज सादर करू शकता.

वरील एरर हा सोमवारी दुपार पर्यन्त पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आपण ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. MahaDBT Seeds Application
* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर
* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार
* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही
* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?
* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६
* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर


