PM Kisan Mandhan Yojana : शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असला तरी बदलते हवामान, दुष्काळ, अतिवृष्टी आणि उत्पादनातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कायमस्वरूपी स्थिर राहत नाही तर ते परिस्थिति नुसार बदलत आहे. शेतकर्यांचे वय वाढल्यानंतर शेतीतील मेहनतही कमी होते, त्यामुळे आर्थिक अडचणी वाढतात. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली असून, ही योजना शेतकर्यांना वृद्धापकाळात आर्थिक आधार देणारी ही महत्त्वाची योजना ठरत आहे. (PM Kisan Mandhan Yojana)
योजनेचा उद्देश
अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांना उतारवयात निश्चित उत्पन्न मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना नियमित पेन्शन मिळाल्यास वृद्धापकाळात त्यांना दैनंदिन खर्च भागवणे, औषधोपचार करणे आणि कुटुंबाचा सांभाळ करणे सोपे होते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षिततेचे कवच ठरत आहे. PM Kisan Mandhan Yojana
मिळणार ३,००० रुपयांची मासिक पेन्शन
या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३,००० रुपयांचे निवृत्तीवेतन दिले जाते. म्हणजेच वर्षाला एकूण ३६,००० रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. ही रक्कम शेतकर्यांना औषधोपचार, घरगुती गरजा किंवा इतर आवश्यक खर्च भागवण्यासाठी मोठा आधार ठरते. विशेषतः उत्पन्नाचे इतर साधन नसलेल्या वृद्ध शेतकऱ्यांसाठी ही योजना दिलासादायक आहे.
प्रीमियम रक्कम किती भरावी लागते?
या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना दरमहा एक ठराविक प्रीमियम भरावा लागतो. हा प्रीमियम शेतकऱ्यांच्या वयानुसार ५५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत असतो. PM Kisan Mandhan Yojana
यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांनी जितकी रक्कम भरली जाते, तितकीच रक्कम केंद्र सरकार त्यांच्या खात्यात जमा करते. त्यामुळे ही योजना दुहेरी लाभ देणारी ठरते. कमी वयात योजनेत सहभागी झाल्यास प्रीमियम कमी भरावा लागतो, हा त्याचा आणखी एक फायदा आहे.
शेतकऱ्याचा मासिक हप्ता त्याच्या वयानुसार ठरवला जातो:
- 18 वर्षे वय: दरमहा 55 रुपये.
- 40 वर्षे वय: दरमहा 200 रुपये.
(वयानुसार ही रक्कम 55 ते 200 रुपयांच्या दरम्यान असते).
पात्रता आणि निकष
>> वय: 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणतेही शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात.
>> जमीन: ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर (5 एकर) किंवा त्यापेक्षा कमी शेतीयोग्य जमीन आहे, तेच या योजनेसाठी पात्र आहेत.
>>अपवाद: ज्यांना आधीच इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनांचा (उदा. NPS, EPFO) लाभ मिळत आहे, ते या योजनेसाठी पात्र नाहीत.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक (आधार लिंक असलेले)
- मोबाईल नंबर
- 7/12 उतारा आणि 8-अ उतारा
अर्ज कसा करावा?
>> CSC केंद्र: तुमच्या जवळच्या ‘सीएससी (CSC) केंद्रावर’ किंवा ‘महा-ई-सेवा केंद्रावर’ जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता.
>> स्वत: नोंदणी: तुम्ही maandhan.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतः देखील अर्ज करू शकता.
>> PM-Kisan लाभार्थ्यांसाठी: जे शेतकरी आधीच PM-Kisan योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना थेट या योजनेत सहभागी होण्याचा पर्याय दिला जातो, ज्यामध्ये त्यांचा हप्ता थेट PM-Kisan च्या हप्त्यातून कापला जाऊ शकतो.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या वयानुसार प्रीमियम निश्चित केला जातो आणि त्यानुसार दरमहा रक्कम जमा करावी लागते. प्रक्रिया सोपी असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरीही सहजपणे या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उतारवयातील औषधोपचार आणि इतर दैनंदिन गरजांसाठी एक हक्काचे आर्थिक साधन उपलब्ध होते. PM Kisan Mandhan Yojana
* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू
* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर
* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार
* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही
* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?
* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६
* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर
