Crop Damage Compensation : माहे जुलै ते सप्टेंबर 2024 अतिवृष्टी मदत वाटप सुरू | ई-केवायसी केली का?
Crop Damage Compensation : अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
तर, चालू वर्षी माहे जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधी मध्ये राज्यातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मुळे शेत पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्याबाबत चा तसा अहवाला शासनाकडे सादर करून निधि हा जिल्हास्तरावर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता अतिवृष्टी मुळे बाधित शेतकर्यांना ही मदत वितरण सुरू करण्यात आले आहे. (Crop Damage Compensation)
प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयामर्फत हे अनुदान वितरण करण्यात येते, यामध्ये तहसील कार्यालया मार्फत महा आयटी पोर्टल वर बाधित शेतकर्यांच्या आधार , मोबाइल नंबर सहित याद्या आपलोड केल्या जातात त्यानंतर प्रत्येक लाभार्थी शेतकरी यांना एक विशिष्ट क्रमांक मिळतो त्यानंतर त्या लाभार्थी शेतकरी यांना त्या विशिष्ट क्रमांक द्वारे जवळील महा ई सेवा केंद्र वरुण आपली ekyc करून घ्यावी लागते आणि kyc झाल्यानंतर हे अनुदान शेतकर्यांच्या आधार संलग्न बँक खात्या मध्ये जमा केले जाते. (Crop Damage Compensation)
तर, सर्व तालुक्यांमध्ये याद्या आपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे जशा याद्या होतील आणि VK नंबर, ekyc होतील तसे अनुदान वितरण होत आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांना व्हीके नंबर प्राप्त झाले आहेत त्यांनी आपली ekyc करून घ्यावी.
अधिक माहिती साठी आपण आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालय येथील नैसर्गिक आपत्ति विभागा मध्ये भेट द्यावी.
ई केवायसी कोठे करावी? (Crop Damage Compensation ekyc)
अतिवृष्टी अनुदान साठी आपण आपल्या जवळील सीएससी केंद्र वरती भेट द्या. ekyc करिता आपल्याला व्हीके नंबर आवश्यक असतो.
Tags: Crop_Damage_Compensation, crop_damage_compensation_ekyc, crop_insurance_claim_compensation, crop_damage, excess_rainfall_damage, ndrf, maharashtra_gov_compensation, crop_subsidy,
* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा
* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?
* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी
* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर
* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू