MahaDBT Seed Lottery: महाडीबीटी अनुदानित बियाणे सोडत झाली | पहा कसे मिळणार अनुदानित बियाणे
महाडीबीटी पोर्टल द्वारे अनुदानित बियाणे वितरण साठी जिल्हास्तरावरती कृषि विभाग कडून नियोजन हे पूर्ण झालेले आहे MahaDBT Seed Lottery आणि यामध्ये सोयाबीन, मूग, तूर, उडीद, बियाणे अनुदानावरती वितरण करण्यासाठी जिल्हास्तरावरती सोडत काढण्यात आली आहे.
महाडीबीटी अनुदानित बियाणे
महाडीबीटी पोर्टल द्वारे खरीप हंगाम 2023 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे बियाणे वितरण साठी MahaDBT Seed Lottery अर्ज मागविण्यात आले होते. अनुदानित बियाणे मिळविण्यासाठी कृषि विभाग मार्फत महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याचे आवाहन शेतकर्यांना करण्यात आले होते. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही 28 मे ही देण्यात आली होती.
बियाणे सोडत
महाडीबीटी पोर्टल वर प्राप्त झालेल्या अर्जामधून जिल्हास्तरावरती कृषि विभागाकडून बियाणे सोडत MahaDBT Seed Lottery काढण्यात आल्या आहेत. या सोडत मध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना कृषि विभागाकडून एक परमीट दिले जाणार आहेत.
बियाणे सोडत यादी
जिल्हास्तरावरती काढण्यात आलेल्या बियाणे सोडत ची यादी ही आपण आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे संपर्क करून मिळवू शकता.
अनुदानित बियाणे वितरण प्रक्रिया
महाडीबीटी पोर्टल वर प्राप्त अर्जामधुन शेतकर्यांची बियाणे साठी निवड करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकर्यांना तालुका कृषि अधिकारी कार्यालयातून परमीट देण्यात येतील. त्या परमीट वरती लाभर्थ्याचे नाव, गाव, अनुदानित बियाणे वाण, आणि बॅग संख्या नोंदविलेल्या असतील.
तसेच, त्या परमीट वरती तालुक्यातील ज्या कृषि केंद्र वरुण बियाणे उचल करावायची आहे त्या कृषि सेवा केंद्राचे नाव आसेल.
अशा प्रकारचे हे परमीट घेऊन शेतकर्यांनी बियाणे वितरक/कृषि सेवा केंद्र वरती जावे आणि बियाणे अनुदान रक्कम वगळून जी रक्कम असेल ती त्या कृषि केंद्र वरती देऊन उपलब्ध बियाणे उचल करावी. सोयाबीन प्रमाणित बियाणे वितरण करिता रु. 1200/- प्रती 30 किलो बॅग अनुदान असेल.
अधिक वाचा :
* कुसुम सोलर पंप योजना अपडेट जून 2023
* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 02 जून 2023
* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा
* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?