Fertilizer Rationing : युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या आवक वर परिणाम झाल्याने आगामी येणार्या खरीप हंगामात खतांचे रेशनिंग करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या लागवडीनुसार खतांचे वितरण केले जाईल, अशी माहिती माननीय कृषिमंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांनी सोमवारी येथे दिली आहे.
माननीय कृषिमंत्री हे खरीप आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘‘राज्यात ४८ लाख टन खतांची मागणी असून पुरवठा समप्रमाणात राखण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. हवामान विभागाने ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविल्याने आपत्कालीन पीक योजनाही तयार केली आहे.
राज्यात २८ लाख टन खतांची गरज असून, त्यापैकी पंधरा लाख टन युरियाची गरज असते. केंद्र सरकारने खत पुरवठ्याची ग्वाही दिली असली, तरी प्रत्येक शेतकऱ्याला खत मिळावे, यासाठी कृषी विभाग नियोजन करत आहे. Fertilizer Rationing
तर, काही शेतकरी हे गरजेपेक्षा जास्त खरेदी करत असल्याने वितरणात असमानता येत आहे. गरजू इतर शेतकर्यांना खत मिळत नाहीये त्यामुळे ‘ॲग्रीस्टॅक’मधील डिजिटल क्रॉप सर्व्हेनुसार नोंदवलेल्या ८० लाख हेक्टरवरील पिकांच्या आधारे खतांची गरज निश्चित केली जाईल. यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती आखली जात आहे. असे आयुक्त यांनी सांगितले आहे. Fertilizer Rationing
तर, आता आगामी खरीप हंगामात खतांच्या वितरणासाठी ॲग्रीस्टॅक योजनेतील डिजिटल क्रॉपसर्व्हे यात नोंदविलेल्या पीक आणि त्याच्या लागवड क्षेत्रानुसार खते वितरण केली जातील व यासाठी नियोजन केले जात आहे. Fertilizer Rationing
* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही
* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?
* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६
* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर
* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी
* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?
* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?
