Mahavitaran Solar Pump : महावितरण चे सोलर पंप साठी अर्ज सुरू | असा करा अर्ज?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी सौर कृषी पंप Mahavitaran Solar Pump उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना ही राज्यात राबविण्यात येत आहे परंतु, आता राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांना आता महावितरण कडून देखील सोलर पंप योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Mahavitaran Solar Pump

राज्य शासनाने महावितरण कंपनीला कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत 2 लाख सोलर पंप वाटपाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता महावितरण कंपनीकडून राज्यातील शेतकर्‍यांना सोलर पंप मिळणार आहेत. Mahavitaran Solar Pump

 

Mahavitaran Solar Pump

 

तर, खालील पद्धतीचा वापर करून आपण महावितरण कडून सोलर पंप चा लाभ घेऊ शकता. Mahavitaran Solar Pump

 

1. प्रथम आपल्याला नवीन कनेक्शन साठी महावितरण कडे अर्ज करावा लागेल यासाठी आपण महाडिस्कोम च्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे ही आपलोड करावी लागतात ती तयार ठेवावीत.

 

ऑनलाइन अर्ज : येथे भेट द्या

  https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest

 

 

2. त्यानंतर आपण खालील लिंक वर जाऊन ऑनलाइन कोटेशन भरणा करावा

येथे भेट द्या

https://css.mahadiscom.in/UI/PAYNC/SearchApplication.aspx

 

 

3. पुढे 2-3 तास थांबून आपला अर्ज हा सोलर पंप मध्ये कन्वर्ट करून यासाठी आपण खालील लिंक चा वापर करा.

https://kusumbenef.mahadiscom.in/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

 

 

4. सोलर पंप मध्ये अर्ज कन्वर्ट झाल्यानंतर आपल्याला एक आयडी ID आणि पासवर्ड मिळेल तो आपण खालील लिंक वर जाऊन लॉगिन करून आपला सोलर पंप चा अर्ज पूर्ण करून घ्यावा.

https://kusumbenef.mahadiscom.in/beneficiary/

 

 

5. पुढे आपल्याला सोलर पंप चे उर्वरित रक्कम भरणा करण्या साठी आपण महावितरण चे कुसुम बेनेफिसियरी हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करून त्यामध्ये लॉगिन करायचे आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.msedcl.kusum_benef

 

 

 

6. त्यानंतर आपल्याला सेल्फ सर्वे करून उर्वरित रक्कम भरणा करावयाची आहे आणि नंतर आपल्याला सोलर पंप ची कंपनी निवडण्याचा पर्याय येईल.

 

 

7. कंपनी निवडून आपण अर्ज पूर्ण करू शकता आणि त्यानंतर आपल्याला सोलर पंप बसविण्यासंदर्भात लाइनमन/कंपनी प्रतींनिधी यांच्याकडून संपर्क करण्यात येईल.

 

अधिक माहिती साठी आपण आपल्या गावातील महावितरण कर्मचारी/लाइनमन यांच्याशी संपर्क करू शकता.

 

अधिक वाचा :

* नवीन पद्धतीने कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा

* आचारसंहिता लागू असल्याने कृषि यांत्रिकीकरण घटकासाठी पूर्वसंमती मिळणार का?

* शेतकर्‍यांनो सावध रहा, कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* “या” शेतकर्‍यांना कुसुम सोलर पंप साठी पेमेंट ऑप्शन आले

error: Content is protected !!