MahaDBT Farmer Portal : कृषि यांत्रिकीकरण, कृषि सिंचन साठी निधि मंजूर | आता लवकरच महाडीबीटी योजनांची सोडत निघणार?
MahaDBT Farmer Portal : कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्यांना कृषि यंत्र अनुदान, सिंचन साधने अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्यांनी घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते.
परंतु, चालू आर्थिक वर्षामध्ये महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यंत्र औजारे आणि तुषार ठिबक साठी कोणत्याही प्रकारची सोडत काढण्यात आली नव्हती कारण, या योजनांसाठी अद्याप निधि मंजूर करण्यात आलेला नव्हता.(MahaDBT Farmer Portal)
परंतु, आता दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना आणि राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत निधि मंजूर करण्यात आला आहेत. त्यामुळे, आता पुढील काही दिवसांत महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण आणि सिंचन साधने आणि सुविधा या घटकांची सोडत निघण्याची शक्यता आहे. (MahaDBT Farmer Portal)
तर, जे शेतकरी या योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी चे शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहेत (MahaDBT Farmer Portal)
राष्ट्रीय कृषि सिंचन विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजने करिता सर्वसाधारण प्रवर्गाचा रु.२००,८१,६६,६६७/- निधी वितरीत करणेबाबत.
राष्ट्रीय कृपे विकास योजना-कॅफेटेरिया च्या प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) घटकाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिर्याचा रु.१२०,४९,००,०००/- (रुपये एकशे वीस कोटी एकोणपन्नास लाख फक्त) व त्या समरुप राज्य हिळछ्याचा रु.८०,३२,६६,६६७/- (रुपये ऐशी कोटी बत्तीस लाख सहासष्ट हजार सहाशे सदुसप्ट फक्त) असा एकूण रु.२००,८१,६६,६६७/- कोटी (रुपये दोनशे कोटी एक्याऐंशी लाख सहासष्ट हजार सहादे सदुसपष्ट फक्त ) निधी आयुक्त (कृपि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सन २०२४-२५ मध्ये राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी रु.२७.७५ कोटी निधी वितरीत करण्याबाबत…..
सन २०२४-२५ या वर्षात राज्य पुरस्कृत कृपि यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रू. २७.७५ कोटी (अक्षरी रुपये सत्तावीस कोटी पंचाहत्तर लाख फक्त) आयुक्त (कृपि) यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (बीडीएस) वितरीत करण्यात येत असून सदर निधी सन २०२४-२५ करिता खालील लेखाशिर्पाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.
* अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी? Soyabin Kapus anudan ekyc
* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?
* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू
* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे
* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…