MahaDBT Farmer : महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल | आता क्षेत्रा नुसार मिळणार अनुदान रक्कम | अर्ज करताना ही काळजी घ्या?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

MahaDBT Farmer : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे देण्यात येणार्‍या तुषार संच 75 एमएम च्या अनुदान रकमेत बदल करण्यात आला असून आता शेतकर्‍यांना त्यांनी त्यांच्या अर्जा मध्ये नमूद केलेल्या क्षेत्रा नुसार अनुदान परिगणणा करण्यात येणार आहे.

 

Mahadbt Farmer Scheme Sprinkler

 

 

कृषि विभागामार्फत राज्यातील शेतकर्‍यांना महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि योजनांचा लाभ दिल्या जातो. यामध्ये तुषार संच चा लाभ हा शेतकर्‍यांना देण्यात येतो. या चा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकर्‍याला कृषि विभागाच्या महाडीबीटी शेतकरी योजना MahaDBT Farmer पोर्टल वर नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी केल्यानंतर सोडत पद्धतीने शेतकर्‍यांची निवड करून त्या शेतकर्‍यांना घटकाचा लाभ दिला जातो.

 

 

तुषार संच साठी शेतकर्‍यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत 13306/- (55%)  आणि मुख्यमंत्री शास्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत 6048/- (25%) अनुदान देण्यात येते. तर, यापूर्वी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत शेतकर्‍यांना 1 हे क्षेत्र पर्यन्त रु. 13306/- असे अनुदान दिल्या जात होते.

 

 

परंतु, आता कृषि आयुक्तालया च्या 05 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रका नुसार लाभार्थ्याने अर्जा मध्ये नमूद केलेल्या क्षेत्रा नुसार अनुदान परिगणणा करण्यात येणार आहे.

 

 

समजा : एका शेतकर्‍याचे तुषार संच 75 एमएम साठी अर्जा नुसार प्रस्तावित क्षेत्र हे 0.40 हे असे आहे तर त्या शेतकर्‍याला केंद्र सरकार च्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे 7266/- इतके अनुदान देय असेल आणि हेच क्षेत्र जर 1.00 हे प्रस्तावित असेल तर अनुदान रक्कम ही 13306/- इतकी असेल.

 

 

अर्ज करताना ही काळजी घ्या? MahaDBT Farmer

 

 

तर, तुषार संच साठी आता Pro rata basis वरती अनुदान परिगणणा करण्यात येणार असल्यामुळे शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत.

 

 

  1. महाडीबीटी वर आपले असलेले सर्व गट क्रमांक आणि क्षेत्र हे जमीन तपशील मध्ये नोंदवावे
  2. अर्ज करताना आपल्याकडे 1 हे पेक्षा अधिक क्षेत्र असेल तर तुषार संच साठी प्रस्तावित क्षेत्र हे किमान 1.00 हे टाकावे.
  3. आणि एकूण क्षेत्र च जर 1.00 हे पेक्षा कमी असेल तर जेवढे क्षेत्र आहे ते संपूर्ण क्षेत्र तुषार संच साठी प्रस्तावित करावे.

 

 

क्षेत्र निहाय मिळणारे अनुदान

Pro Rata Basis Pmksy Pdmc 16 Jan 2024 Page 1

 

 

Pro Rata Basis Pmksy Pdmc 16 Jan 2024 Page 2

 

अनुदान परिगणणा बाबत चे कृषि आयुक्तालयाचे पत्र : डाऊनलोड करा

 

 

क्षेत्र निहाय मिळणारे अनुदान परिगणणा : डाऊनलोड करा

 

अधिक वाचा :

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!