Mahaurja Kusum Update : महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24 | Kusum Solar Pump Yojana 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

मागील दोन वर्षांपासून राज्यातील शेतकरी हे कुसुम सोलर पंप (Mahaurja Kusum Update) साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत आहेत. परंतु, शेतकर्‍यांची दिशाभूल करण्यासाठी काही बनावट वेबसाइट करून शेतकर्‍यांची फसवणूक होत आहे. तर, सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की कुसुम सोलर पंप योजना ही महा ऊर्जा या विभागाकडून राबविण्यात येते आणि या विभागाचे फक्त एकच अधिकृत संकेतस्थळ आहे (www.mahaurja.com)  

 

Mahaurja Kusum Update

 

महाऊर्जा विभागाने खालील सूचना जाहीर केली आहे (Mahaurja Kusum Update):

 

 

प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या नावाखाली फसव्या वेबसाईट पासून सावध रहा

 

शासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक बनावट वेबसाईट आणि मोबाईल एप्लिकेशन दारे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधानमंत्री -कुसुम योजना) च्या नावाने शेतकऱ्यांकडून सौर पंप बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नोंदणी शुल्क आणि पंपाची किंमत ऑनलाईन भरण्यास सांगितले जात आहे.(Mahaurja Kusum Update)

 

 

यापैकी काही बनावट वेब-साईट डोमेन आहेत त्यामुळे प्रधानमंत्री-कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी फसव्या वेब-साईट वर जावू नये आणि कोणतेही शुल्क भरु नये. प्रधानमंत्री-कुसुम योजना राज्य शासनाच्या महाऊर्जा मार्फत राबविण्यात येत आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे (MEDA)च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या www.mahaurja.com किंवा ०२०-३५०० ०४५० वर संपर्क साधावा.

 

 

कुसुम सोलर पंप पात्रता यादी

 

 

अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

* रब्बी पीक पेरा डाऊनलोड करा

* महाडीबीटी 01 नोव्हंबर सोडत यादी पहा

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!