Soyabin Kapus anudan e peek pahani : अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे अशा शेतकर्यांसाठी महत्वाची बातमी | आता तलाठी देणार नवीन अनुदान यादी?
Soyabin Kapus anudan e peek pahani : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. आणि अनुदान वितरण साठी पोर्टल तयार करण्यात येऊन वितरणाची कार्यवाही सुरू आहे.
त्यानुसार कृषि आयुक्तालया मार्फत ई पीक पाहणी केलेल्या शेतकर्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु, या यादी मध्ये पीक पाहणी केलेल्या काही शेतकर्यांची देखील नावे दिसत नव्हती. त्यामुळे आता ई पीक पाहणी एवजी आता सातबारा वरती खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन व कापूस पिकाची नोंद असेल तर आता त्या शेतकर्यांना अनुदान मिळण्यासाठी पात्र करण्यात येणार आहे. (Soyabin Kapus anudan e peek pahani)
राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी अँप/पोर्टलट्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र राहणार आहेत आणि ई-पीक पाहणी अँप/पोर्टल वर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
तर, दिनांक 12 सप्टेंबर 2024 , मुख्य सचिव, महसूल विभाग यांच्या परिपत्रक नुसार >>
राज्यातील “सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य” योजनेत प्रती शेतकरी २ हेक्टर च्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक’शेतकऱ्यांना रु.५०००/- प्रती हेक्टर च्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय शासनाने कृषि विभागामार्फत घेतलेला आहे. यासाठी ई-पिक पाहणी नोंदीनुसार शेतकरी खातेदार यांच्या याद्या कृषि विभागाने गावनिहाय ठळक ठिकाणी प्रदर्शित केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उता-यावर कापूस / सोयाबीन पिकाची नोंद आहे मात्र ई-पिक पाहणी मध्ये त्यांचे नाव आले नाही अशा तक्रारी काही ठिकाणावरून प्राप्त झाल्याची बाब कृषि विभागाने महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. (Soyabin Kapus anudan e peek pahani)
कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत याकरीता खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी:-
अ) खरीप हंगाम २०२३ च्या ७/९२ उता-यावर नोंद असून ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद नसलेले खातेदार:- खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कार्यपद्धती अंतर्गत गावनिहाय ई- पिक पाहणी यादी वरून संबंधित तलाठी यांनी गाव नमुना नंबर १२ वरून या ई-पिक पाहणी यादीत नसलेल्या परंतु त्यांचे ७/१२ वर कापूस / सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा शेतक-यांची यादी सही करून कृषि विभागाचे कृषी सहाय्यक यांना देण्यात यावी.
(Soyabin Kapus anudan e peek pahani)
तर, वरील प्रमाणे सूचना मुख्य सचिव महसूल यांनी दिल्या आहेत. यानुसार आता तलाठी हे गाव नमुना नंबर १२ वरून या ई-पिक पाहणी यादीत नसलेल्या परंतु त्यांचे ७/१२ वर कापूस / सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा शेतक-यांची यादी सही करून कृषि विभागाकडे सादर करतील आणि नंतर असे पात्र शेतकरी हे आपले आधार संमती पत्र हे कृषि विभागाकडे सादर करून अनुदाना साठी पात्र ठरतील. (Soyabin Kapus anudan e peek pahani)
* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?
* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…
* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस
* “या” तारखेपासून शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान
* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज