Soyabin Kapus Anudan : सामाईक खातेदारांनो लवकर ekyc करून घ्या, सोयाबीन-कापूस अनुदान 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Soyabin Kapus Anudan : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 2 हेक्‍टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे आणि अनुदान वितरण साठी पोर्टल तयार करण्यात येऊन वितरणाची कार्यवाही करण्यात आली आहे.

 

 

सोयाबीन कापूस अनुदान योजना मध्ये सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतक-यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. मात्र ही मदत शेतकर्‍यांना मिळण्यासाठी ‘केवायसी’ (क्नो यूवर कस्टमर) अर्थात, ‘पात्र लाभार्थी असल्याची पडताळणी’ पूर्ण करण्याची देखील अट आहे. त्यासाठी संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. (Soyabin Kapus Anudan)

 

 

तर, ज्या खातेदारांचे नाव सामाईक खातेदार यादी मध्ये आहे त्यांनी आपले सामाईक खातेदार ना हरकत व संमती पत्र हे एफिडेविट स्वरुपात कृषि कार्यालयात लवकर सादर करावेत. तसेच, ज्या शेतकर्‍यांनी एफिडेविट सादर केले आहेत त्यांनी हे अनुदान मिळण्यासाठी आपली ekyc करून घ्यावी. कारण, ekyc केली तरच हे अनुदान मिळणार आहे.

 

 

त्यामुळे, ज्या सामाईक खातेदार शेतकर्‍यांनी एफिडेविट सादर केले आहेत त्यांनी हे अनुदान मिळण्यासाठी आपली ekyc तात्काळ करून घ्यावी. (Soyabin Kapus Anudan)

 

 

सामाईक खातेदार ekyc करत असताना ज्या खातेदारा च्या  खात्या मध्ये अनुदान घेणे करिता संमती सादर केली आहे अश्या एकाच खातेदाराने आपली ekyc पूर्ण करून घ्यावयाची आहे. 

 

अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी?

 

 

Tags: soyabin_kapus_anudan_ekyc, joint_land_holding_consent, soyabin_kapus_anduan, soybean_cotton_subsidy_maharashtra_government, maharashtra_government_farmer_schemes, Soyabin Kapus Anudan, 

 

हे पण पहा :

 

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी

* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* कृषि विद्यापीठाचे नवीन हरभरा वाण विक्रीस उपलब्ध | परभणी चना-16

* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?

* रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर

* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी

error: Content is protected !!