Laxmi Mukti Yojana : वडिलोपर्जित संपत्तीबाबत, विशेषतः जमीनजुमल्याबाबतचे निर्णय घरचा कर्ता पुरुषच घेत असे. एखाद्या व्यक्तीने कर्जबाजारीपणात जमीन विकून मोकळं व्हायचं, अशी स्थिती असे.अशा परिस्थितीत महिलांना स्थैर्य मिळावे म्हणून शासनाने सुरू केलेल्या लक्ष्मी मुक्ती योजनेतून महिला शेतीत सहहिस्सेदार होऊ शकतात.
शासनाने महिलांना सन्मान मिळावा, विशेषतः जमिनीची विक्री करताना घरच्या कर्त्याने गृहलक्ष्मीला विश्वासात घ्यावे, यासाठी ‘लक्ष्मी मुक्ती योजना’ लागू केली. या योजनेत, ज्या महिलांचे नाव सातबारा उताऱ्यावर नाही, त्यांनी अर्ज केल्यास तलाठ्याकडून संबंधित खातेदाराच्या अर्जावर महिलेचे नाव सातबारा उताऱ्यावर दाखल होते. या नामांकराबाबत मंडळ निरीक्षकांकडून पडताळणी झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर मालकी हक्कात सहहिस्सेदार म्हणून महिलेचे नाव लावण्यात येते. Laxmi Mukti Yojana
या उपक्रमामुळे महिलांनाही आता किसान सन्मान योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. तसेच सहहिस्सेदार महिलेच्या संमतीविना जमिनीची विक्री करता येत नसल्याने महिलांना मालमत्तेबाबत स्थैर्य प्राप्त झाले आहे. Laxmi Mukti Yojana
योजनेचा मुख्य उद्देश
बऱ्याचदा शेती पतीच्या नावावर असते, पण पत्नी दिवसभर शेतात राबत असते. या योजनेद्वारे पतीच्या ७/१२ उताऱ्यावर पत्नीचे नाव ‘सह-धारक’ (Co-owner) म्हणून लावले जाते. यामुळे जमिनीवर पत्नीचा कायदेशीर अधिकार निर्माण होतो.
महिलांना फायदा कसा असेल?
>> शेतीवर कायदेशीर हक्क, आर्थिक ओळख निर्माण, बँक कर्जासाठी पात्रता, शासकीय योजनांचा लाभ आणि निर्णय प्रक्रियेत सहभागाची संधी मिळणार आहे. महाडीबीटी (MahaDBT) अंतर्गत मिळणारे ट्रॅक्टर, ठिबक सिंचन किंवा इतर अनुदानांसाठी महिलांना प्राधान्य मिळू शकते.
>> नाव सातबाऱ्यावर आल्यानंतर पीक कर्ज, स्वयंरोजगार कर्ज, कृषी अनुदान, महिला सक्षमीकरण योजनेसाठी महिला पात्र ठरणार आहेत Laxmi Mukti Yojana
काय आहे ‘लक्ष्मी मुक्ती’ योजना?
पतीच्या किंवा कुटुंब प्रमुखाच्या नावावर असलेल्या शेतीमध्ये पत्नीचे किंवा कुटुंबातील महिलेचे नाव सहहिस्सेदार म्हणून सातबारा उताऱ्यावर नोंदवण्याची योजना म्हणजे ‘लक्ष्मी मुक्ती’ योजना होय.
ना नोंदणी, ना मुद्रांक शुल्क… मोफत?
शासनाने सुरु केलेल्या ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेत महिलांच्या नावाने सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणीसाठी शासनाकडून नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक शुल्क घेतले जात नाही.
नाव नोंदवण्याची प्रक्रिया (How to Apply)
-
अर्ज कुठे करावा: गावाच्या तलाठी कार्यालयात पती-पत्नीने संयुक्त अर्ज द्यावा.
-
आवश्यक कागदपत्रे:
-
सध्याचा ७/१२ आणि ८-अ उतारा.
-
पती-पत्नीचे आधार कार्ड.
-
रेशन कार्ड.
-
विवाह नोंदणी प्रमाणपत्र (किंवा सरपंच/ग्रामसेवक यांचा दाखला).
-
* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही
* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?
* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६
* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर

