Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या कर्ज योजनांची प्रक्रिया आता अत्यंत सोपी आणि पारदर्शक झाली आहे. मुख्य म्हणजे, आता नवीन मोबाईल ॲप आणि ऑनलाइन पोर्टल मुळे तरुणांना बँकेचे उंबरठे झिजवण्याची गरज उरलेली नाही. मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने डिजिटल पाऊल टाकत आपले स्वतंत्र मोबाइल अॅप लाँच केले आहे. यामुळे लाभार्थ्यांना कर्ज प्रक्रियेसाठी आता सायबर कॅफे किंवा एजंटांच्या दारी जाण्याची गरज उरणार नाही. (Annasaheb Patil Mahamandal)
अवघ्या एका ‘क्लिक’वर संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. Annasaheb Patil Mahamandal
यागोदर लाभार्थ्यांना सर्व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी संगणकाचा किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. यात अनेकदा तांत्रिक अडचणी येत आणि काही प्रकरणांमध्ये एजंटांकडून फसवणुकीचे प्रकारही घडले होते. हे टाळण्यासाठी ‘यूजर फ्रेंडली’ अॅपची घोषणा केली आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल. Annasaheb Patil Mahamandal
ज्या लाभार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही, त्यांच्यासाठी महामंडळाने ‘आपले सरकार’ केंद्रांशी करार केला असून, केवळ ८५ रुपयांत या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
> महामंडळाने केवळ अॅपच नाही, तर जिओ-फेन्सिंग आणि ई-एचआरएमएस प्रणालीचाही वापर सुरू केला आहे.
> गुगल मॅपच्या साहाय्याने जिल्हा समन्वयक व्यवसायाची पाहणी करतील.
> यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना तातडीने मदत मिळणे सोपे होणार आहे.
> जास्तीत जास्त तरुण उद्योजकांनी या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
या अॅपमधील प्रमुख वैशिष्ट्ये :
एकाच ठिकाणी सर्व टप्पे : एलओआय, सँक्शन आणि क्लेम सादर करणे अशा तिन्ही प्रक्रिया मोबाईलवरूनच पूर्ण होतील.
कागदपत्रे अपलोड : कागदपत्रे स्कॅन करून अॅपवर टाकता येतील.
अर्जाची स्थिती : आपल्या अर्जाचे नेमके काय झाले, याची रिअल-टाइम माहिती मिळणार.
जिओ-टॅगिंग अनिवार्य : व्यवसाय प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री करण्यासाठी आता व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करावे लागेल.”
१. प्रमुख कर्ज योजना (Loan Schemes)
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I): सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० लाखांपर्यंत कर्ज मिळते. यामध्ये तुम्ही बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज महामंडळ भरते.
- गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II): बचत गट किंवा भागीदारी संस्थेसाठी १० लाखांपासून ५० लाखांपर्यंत कर्ज मर्यादा आहे. यामध्येही व्याजाचा परतावा महामंडळ करते.
२. योजनेसाठी पात्रता (Eligibility)
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- लाभार्थी मराठा किंवा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असावा.
- वयोमर्यादा: १८ ते ४५ वर्षे.
- उत्पन्न मर्यादा: वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांच्या आत असावे.
३. प्रक्रिया आता सोपी का झाली?
- नवीन मोबाईल ॲप: आता तुम्ही घरबसल्या मोबाईल ॲपवरून अर्ज करू शकता.
- कागदपत्रे ऑनलाइन: अपूर्ण कागदपत्रांमुळे (Rejected for Incomplete Documents) थांबलेली प्रकरणे आता पुन्हा लॉगिन करून कागदपत्रे अपलोड करून पूर्ण करता येतात.
- पारदर्शक ट्रॅकिंग: तुमच्या अर्जाची स्थिती (Status) काय आहे, हे आता रिअल-टाइममध्ये पाहता येते.
४. आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार स्वाक्षरीचा)
- शाळा सोडल्याचा दाखला (LC) किंवा जन्म दाखला
- रेशन कार्ड
- बँक पासबुक आणि सातबारा उतारा (आवश्यकतेनुसार)
मोबाइल App : येथून डाऊनलोड करा
* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर
* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार
* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही
* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?
* अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना निधि मंजूर | माहे ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६
* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर
