Sugarcane FRP : हंगाम २०२६-२७ च्या उसाच्या एफआरपीत प्रति टनामागे १०० रुपयांची वाढ करून ती ३,६५० रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला आहे. केंद्र सरकारने २०२६-२७ च्या साखर हंगामासाठी उसाच्या रास्त व किफायतशीर दरात (एफआरपी) टना मागे 100 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे आता १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी उसाची एफआरपी ३६५ रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Sugarcane FRP)
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, की साखर उताऱ्यात प्रत्येकी ०.१ टक्के वाढ झाल्यास एफआरपीमध्ये प्रतिक्विंटल ३.५६ रुपयांनी वाढ होईल. त्यामुळे अधिक साखर उतारा मिळविणाऱ्या कारखान्यांना व शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. Sugarcane FRP
सरकारच्या मते, जाहीर करण्यात आलेला एफआरपी हा उत्पादन खर्चाच्या सुमारे २००.५ टक्के इतका आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
प्रति टन ३,६५० रुपये हा दर १०.२५ टक्के साखर उताऱ्याकरिता असेल. यापुढील प्रत्येक टक्क्याला प्रति टन ३५६ रुपये जादा द्यावे लागतील.
मात्र, उतारा साडेनऊ टक्क्यांपेक्षा खाली गेल्यास प्रति टन ३,३८३ रुपये दर देणे साखर कारखान्यांना बंधनकारक राहणार आहे.
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा
* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू
* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर
* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार
* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही
* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?

