Posted in

Loan Waiver : कर्जमाफीची यादी जाहीर होण्याची शक्यता? नियमित कर्जदारांना दोन लाखांपर्यंतचा दिलासा मिळेल का?

Loan waiver
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Loan Waiver : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्राथमिक यादी उद्याच जाहीर करू, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी दिली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची २ लाख रुपयांपर्यंतची थकीत कर्ज माफ करण्याचा निणर्य घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत. कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे ३० जुलैआधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, या चर्चेने जोर धरला आहे. Loan Waiver 

 

कृषिमंत्री म्हणाले, “उद्याच (22 july) आम्ही कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करू. अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. म्हणून उद्याच यादी जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. तांत्रिक अडचणी राहिलेल्या नाहीत. आयकरबाबतचा डेटा परवा प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोणतीच अडचण नाही. ३० जुलैपूर्वीच कर्जमाफीचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार आहेत.” असे ग्वाही त्यांनी दिली.

 

तसेच, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचा दिलासा देण्याच्या किसान सभेच्या मागणीवर कर्जमाफीसाठीच्या उपसमितीत चर्चा करू. त्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. नियमित कर्जदारांना दिलासा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्याची माहिती किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.

 

नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आदी कारणांमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या थकबाकीदार शेतकर्‍यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने 2 जूनच्या बैठकीत या योजनेस मान्यता दिली. योजनेअंतर्गत दि. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जांपैकी दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकी असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली कर्जे विचारात घेतली जाणार आहेत. Loan Waiver

 

 

हे पण पहा :

* असा भरा तुमचा एसआयआर फॉर्म? मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण 

* शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी चे टेंशन मिटले | आता पीक पाहणी सहाय्यक च नोंदविणार आपला पीक पेरा | शासन निर्णय आला 

* शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार? | मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

* दुबार पेरणीचा खर्च सरकार देणार? महसूल मंत्री यांची मोठी घोषणा | बोगस बियाणे कंपनी वर गुन्हे दाखल होणार?

* शेतकर्‍यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना

* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार 

* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा

* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू

error: Content is protected !!