छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना | शासन निर्णय 18 ऑक्टोबर 2023 | मागेल त्याला योजना Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana GR
Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana : राज्यातील शेतकर्यांना आवश्यक असणारा घटक/बाब त्याला मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन दिल्यास त्याचा शेतकऱ्यास मोठया प्रमाणावर फायदा होऊ शकतो. त्यामुळे मा. वित्त मंत्री महोदयांनी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणे नुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येऊन मागेल त्याला फळबाग, ठिबक / तुषार सिंचन शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे, आणि कॉटन श्रेडर देण्याबाबत मागेल त्याला शेततळे या योजनेच्या विस्तारित योजनेस शासन परिपत्रकान्वये मान्यता देण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपुर्ती निमित्त मागेल त्याला फळबाग, ठिबक/ तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देणे या विस्तारित योजनेस “छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना” असे नाव देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. (Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana)
तर, शासनाने कृषि विभागामार्फत सन २०२३-२४ करिता राबविण्यात येणाऱ्या “मागेल त्याला फळबाग, ठिबक / तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे, आणि कॉटन श्रेडर देणे या विस्तारित योजनेस या दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयाव्दारे “छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना” असे नाव देण्यात आले आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana)
शासन निर्णय पहा :
अधिक वाचा :
* निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद??
* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अनुदान वितरण सुरू
* नमो चा पहिला आणि पीएम किसान चा 15 हफ्ता सोबतच मिळणार का??
* आता मिळणार वार्षिक 8000/- रुपये
* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…
* शेतकर्यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा
* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी
* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली