PM Kisan Yojana : eKYC केली नाही तरी पण मिळणार का 15 वा हफ्ता?? | पीएम किसान योजना 15th Installment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana : शेतकर्‍यांनि पीएम किसान योजना अंतर्गत eKYC केली नाही तर त्यांना केंद्र शासनाचा पुढील म्हणजेच 15 वा हफ्ता मिळणार का? असा प्रश्न आता सर्व ekyc न केलेल्या शेतकर्‍यांना पडत आहे. तर, शेतकरी बांधवानो आपण या ठिकाणी eKYC  चे महत्व जाणून घेणार आहोत.

pm kisan yojana update

 

देशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM KISAN yojana) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतराने म्हणजे रु. 2000 चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

 

 

ekyc करणे किती महत्वाचे आहे? PM Kisan Yojana

 

केंद्र शासनाकडून शेतकर्‍यांना 14 वा हफ्ता मिळण्यासाठी ekyc करण्यासाठी सूट देण्यात आली होती परंतु आता लवकरच 15 वा हफ्ता हा शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे तरी या साठी कोणतीही सूट देण्यात आली नाहीये. तर, ज्या शेतकरी बांधवांनी ekyc केली नाही त्या शेतकर्‍यांना पुढील 15 वा हफ्ता मिळणार नसून त्यांना योजनेतून अपात्र देखील केले जाऊ शकते. (PM Kisan Yojana)

 

 

राज्यामध्ये 30 सप्टेंबर ही ekyc करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी ekyc आणि आधार बँक खाते संलग्न केले नाही ते शेतकरी आता योजनेतून अपात्र करण्यात येणार आहेत. तर, ज्या शेतकर्‍यांनी ekyc केली नाही त्यांना आता पुढील 15 वा हफ्ता हा मिळणार नाही.

 

 

आपण Ekyc कुठे करू शकतो?

 

Ekyc ही आपण आपल्या भागातील महा ई सेवा केंद्र / सीएससी केंद्र वरती जाऊन आपली ekyc पूर्ण करू शकतो किंवा आपणा स्वतः खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आधार क्रमांक आणि otp टाकून देखील ekyc करू शकतो.

 

ekyc कशी करावी हे पाहण्यासाठी : येथे भेट द्या

 

 

अधिक वाचा :

* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…

* शेतकर्‍यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा

* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी

* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली

* PoCRA Notice तातडीने हे काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार

* या जिल्ह्यातील 41 मंडळ मध्ये 25% अग्रिम मंजूर

* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प साठी 116 कोटी निधि प्राप्त

* पीएम किसान योजना “या” तारखेपर्यंत e-Kyc पूर्ण करा

error: Content is protected !!