Magel Tyala Saur Krushi Pump Yojana MTSKPY : मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana MTSKPY : सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महारष्ट्रात सन २०१५ पासून सौर कृषीपंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अटल सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यात आली होती.
तसेच सद्यपरिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक – ब योजने अंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येत आहे. राज्यात दि. ०६.०९.२०२४ रोजी पर्यंत 2,63,156 सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषीपंपा बाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे. (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana MTSKPY)
तर, या योजने अंतर्गत मागील दोन महिन्यांपासून पोर्टल वर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले होत तर त्या अर्ज ला आता पेमेंट ऑप्शन देण्यात आले आहे. तर आपण खलील पद्धतीने आपले पेमेंट ऑप्शन आले किंवा नाही हे चेक करू शकता.
एवढी रक्कम भरावी लागेल
3 एचपी साठी : 22971/-
5 एचपी साठी : रु. 32075/-
7.5 एचपी साठी : –
पेमेंट ऑप्शन आले का…. असे करा चेक? (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana)
स्टेप 1. प्रथम आपण खालील लिंक वरती भेट द्या.
स्टेप 2. पुढील स्क्रीन वरती आपला मागेल त्याला सोलार साठी केलेला अर्ज क्रमांक एमके आयडी (MK ID) टाका आणि सर्च या बटन वरती क्लिक करा.
स्टेप 3. पुढे आपल्याला आपला अर्ज तपशील व पंप तपशील दिसेल आणि खाली Proceed to Payment हा पर्याय दिसेल.
स्टेप 4. Proceed to Payment वर क्लिक करावे पुढे Pay Now वर क्लिक करून आपण UPI/DEBIT CARD द्वारे आपले पेमेंट करू शकता.
स्टेप 5. पेमेंट केल्यानंतर आपल्याला अर्ज तपासला जाईल आणि Vendor Selection चा पर्याय येईल व पुढे आपल्याला पंप स्थापित करून मिळेल.
सूचना : ज्या शेतकर्यांचा अर्ज हा परिपूर्ण आहे म्हणजेच ज्यांच्या सात बारा वर विहीर/बोअरवेल ची नोंद आहे किंवा कॅटेगरी मधून अर्ज केला असेल तर प्रमाणपत्र आपलोड केलेले आहे किंवा सामायिक पाण्याचा स्त्रोत असेल तर ना हरकत प्रमाणपत्र अर्ज करताना आपलोड केले आहे .…अशा प्रकारे परिपूर्ण अर्ज असेल तरच पेमेंट करा. कारण तुमचा अर्ज हा पेमेंट केल्यानंतर छाननी ला जाणार आहे आणि यामध्ये तो अर्ज त्रुटि मध्ये आला तर तुम्हाला भरलेली रक्कम परत मिळण्यास बराच कालावधी लागू शकतो. त्यामुळे ज्यांना केलेल्या अर्जा बाबत खात्री आहे त्यांनीच पेमेंट करावे.
ऑनलाइन अर्ज कोठे करावा?
या योजने अंतर्गत नवीन सौर कृषीपंप मिळण्याकरीता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. वेबपोर्टलवरुन किंवा https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या link वर जाऊन, अर्जदारास A-1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करवयाचे आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महावितरण पोर्टल लिंक : येथे भेट द्या
Tags : Magel Tyala Saur Krushi Pump Yojana, magel_tyala_solar_pump_yojana, solar_payment_option, मागेल_त्याला_सोलर_पंप, पेमेंट_ऑप्शन,
* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना
* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे
* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर
* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी
* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार
* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा
* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?
* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी
* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर
* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू