पोकरा प्रकल्प बंद? सोयाबीन, हरभरा बिजोत्पादन अर्जांचे काय होणार? PoCRA Seed Production

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PoCRA Seed Production : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)प्रकल्पातील योजनेचे डेस्क 1, 2 आणि डेस्क 3 वरील कामकाज हे सध्या बंद करण्यात आले असल्याने राज्यातील प्रकल्पातील समाविष्ट गावांमधील शेतकऱ्यांसमोर बिजोत्पादन, फळबाग लागवड, शेडनेट, व इतर अर्ज बाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.

 

pocra-seed-Production

 

कारण, राज्यातील प्रकल्पातील समाविष्ट गावांमधील शेतकर्‍यांनी बिजोत्पादन, फळबाग लागवड, शेडनेट, व इतर घटकासाठी अर्ज केले आहेत परंतु डेस्क बंद असल्यामुळे ह्या अर्जाना पूर्वसंमती मिळत नाहीये परिणामी हे अर्ज डेस्क 1, 2 किंवा 3 वरती च बर्‍याच कालावधी पासून प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना या घटकाचा लाभ मिळणार की नाही हे स्पष्ट होत नाहीये. PoCRA Seed Production

 

 

तसेच, बिजोत्पादन साठी शेतकर्‍यांना प्रकल्पा मध्ये 100% अनुदान देय आहे परंतु आता डेस्क बंद झाल्यामुळे शेतकर्‍यांचे बिजोत्पादन चे अर्ज हे डेस्क वरती प्रलंबित आहेत. आणि बिजोत्पादन घटक हा महाडीबीटी पोर्टल वर देखील उपलब्ध नसल्यामुळे शेतकर्‍यांना आता अनुदान मिळणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. PoCRA Seed Production

 

 

तर, प्रकल्प विशेषज्ञ यांनी संगितले की सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमातून पोकरा ‘टप्पा १’ मध्ये सध्या अर्ज स्वीकारणे बंद आहे. जेव्हा नवीन पोकरा ‘टप्पा २’ सुरू होईल त्यावेळेस बीजोत्पादन या कार्यक्रमावर अधिकाधिक भर दिला जाईल. PoCRA Seed Production

 

 

तसेच, प्रकल्पातील समाविष्ट गावांमधील शेतकरी बांधवांनी तुषार, ठिबक, फळबाग लागवड योजनेचा लाभ हा महाडीबीटी पोर्टल वरुण घेता येईल.

 

अधिक वाचा :

* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार

* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना

* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत

* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा

* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध

error: Content is protected !!