Tur Procurement : तूर हमीभावाने खरेदीसाठी मंजूरी | नोंदणी करण्यास सुरुवात…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.5/5 - (4 votes)

Tur Procurement : सोयाबीन प्रमाणेच आता तुरीची शासकीय खरेदी करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली असून, 22 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली आहे.

 

Tur Procurement
Tur Procurement

 

 

परंतु, तुरीची प्रत्यक्ष खरेदी कधी सुरू होईल, हे स्पष्ट नसले तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी, राज्यातील शेतकरी बांधवांनी तूर शासकीय खरेदी साठी नोंदणी करून घ्यावी.

 

 

 

तर, शासन हे केंद्राने 2024-25 साठी तुरीला 7550 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे त्यानुसार खरेदी करणार आहे. परंतु नवीन तूर बाजारात आली असून, खुल्या बाजारात सरासरी 7125 दर मिळू लागला आहे. प्रतिक्विंटल नुकसान होऊ लागल्याने सोयाबीनप्रमाणे तुरीच्या शासकीय खरेदीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली होती. (Tur Procurement)

 

 

तर, राज्यात तुरीची शासकीय खरेदी ही नाफेड मार्फत करण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंगची वीस केंद्रे आहेत. परंतु, खरेदी-विक्री संघांना पणन विभागाचे पत्र आले असले तरी जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंगला अद्याप सूचना मिळालेल्या नसल्याचे सांगण्यात आले. परंतु लवकरच खरेदी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. (Tur Procurement)

 

 

 

नोंदणी कालावधी ? (Tur Procurement)

 

शेतकरी हे दिनांक 22 फेब्रुवारी पर्यन्त ऑनलाइन नोंदणी करू शकतात. तरी आपण आपल्या तालुक्यातील खरेदी विक्री महासंघ कार्यालय येथे भेट द्यावी.

 

 

शेतकर्‍यांसाठी सूचना

 

शेतकऱ्यांनी तूर हमीभाव खरेदी साठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या नाफेड खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. नोंदणीसाठी ७/१२, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती शेतमाल विक्रीसाठी तारीख दिली जाईल. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन जावा, असं आवाहन करण्यात आले आहे.

 

 

हे पण पहा :

 

* ७/१२ उतारा मध्ये “हे” महत्वाचे 11 बदल

* 1 एप्रिल पासून टप्पा 2 चे काम होणार सुरू | पोकरा प्रकल्प टप्पा 2

* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता

* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार

* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज 

* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?

* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!