PM Kisan Yojana : राज्यात 28 फेब्रुवारी हा “पी.एम.किसान उत्सव दिवस” म्हणून साजरा करण्यात येणार
PM Kisan Yojana : माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी महोदयांच्या शुभहस्ते बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी मौजे भारी, ता. यवतमाळ, जि. यवतमाळ येथून सायं ४.०० वाजता महाराष्ट्रातील सुमारे ८८ लाख लाभार्थींच्या आधार संलग्न बँक खात्यात पी.एम.किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे रू. १९६० कोटी वितरीत होणार आहेत. याच कार्यक्रमात माननीय पंतप्रधानांच्या शुभहस्ते महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुस-या व तिस-या हप्त्याचे अनुक्रमे सुमारे ८५ लाख व ८८ लाख लाभार्थी शेतक-यांना सुमारे रू. ३८०० कोटी रक्कमेचे देखील वितरण थेट आधार संलग्न बँक खात्यात एका क्लिकवर होणार आहे.
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी महोदयांच्या शुभहस्ते बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी मौजे भारी, ता. यवतमाळ, जि. यवतमाळ येथून सायं ४.०० वाजता महाराष्ट्रातील सुमारे ८८ लाख लाभार्थींच्या आधार संलग्न बँक खात्यात पी.एम.किसान PM Kisan Yojana योजनेच्या १६ व्या हप्त्याचे रू. १९६० कोटी वितरीत होणार आहेत. याच कार्यक्रमात माननीय पंतप्रधानांच्या शुभहस्ते महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुस-या व तिस-या हप्त्याचे अनुक्रमे सुमारे ८५ लाख व ८८ लाख लाभार्थी शेतक-यांना सुमारे रू. ३८०० कोटी रक्कमेचे देखील वितरण थेट आधार संलग्न बँक खात्यात एका क्लिकवर होणार आहे.
तर, दि. २८ फेब्रुवारी २०२४ हा दिवस “पी.एम.किसान उत्सव दिवस” म्हणून साजरा करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. यास्तव राज्यातील सर्व मा. जिल्हाधिकारी यांना जिल्हा, तालुका व गाव पातळी तसेच कृषी विज्ञान केंद्र (रट), सामाईक सुविधा केंद्र (050) या ठिकाणी “पी.एम.किसान उत्सव दिवस” साजरा करणे बाबत कृषि आयुक्तालय कार्यालयाकडून सूचित करण्यात आले आहे. PM Kisan Yojana
सदर समारंभासाठी माननीय खासदार ब आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करावे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM Kisan Yojana व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांमध्ये शेतकऱ्यांच्या सहभागासाठी प्रचार व प्रसिध्दी करावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. माननीय पंतप्रधानांच्या शुभहस्ते होणा-या पी.एम.किसान निधी वितरणाच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी आपण https://pmindiawebcast.nic.in/ ही लिंक वापरू शकता.
महाडीबीटी लॉटरी यादी पहा : 22 फेब्रुवारी 2024
अधिक वाचा :
* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल
* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ
* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी
* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा
* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा
* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा
* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा
* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज
* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान
* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक