दुष्काळ यादी २०२३ : राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर | या सवलती होणार लागू | शासन निर्णय Drought in Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

राज्यामध्ये काही तालुक्यांमध्ये दुष्काळ (Drought in Maharashtra) जाहीर करण्यात आला असून या दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये लागू होणार्‍या सवलती बाबत दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला आहे तर या दुष्काळ जाहीर केलेले तालुके आणि सवलती आपण खालील भागात पाहू शकता.

 

Drought In Maharashtra

 

महाराष्ट्र राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून राज्य शासन ३१ ऑक्टोबर च्या या शासन निर्णया सोबतच्या परिशिष्ट – “अ” मध्ये दर्शविल्यानुसार १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यामध्ये गंभीर तर १६ तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर (Drought in Maharashtra) करीत आहे.

 

लागू करण्यात आलेल्या सवलती

 

दुष्काळ (Drought in Maharashtra) घोषित करण्यात येत असलेल्या ४० तालुक्यामध्ये खालील सवलती लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे

 

 

१) जमीन महसूलात सूट.

२) पिक कर्जाचे पुनर्गठन.

३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती.

४) कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.

५) शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी.

६) रो ह यो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.

७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर.

८) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

 

दुष्काळी तालुके Drought in Maharashtra

 

दुष्काळ जाहीर करण्यात आलेले तालुके खालील प्रमाणे आहेत : 

 

Drought in Maharashtra

 

शासन निर्णय 

शासन निर्णय डाऊनलोड करा

 

अधिक वाचा :

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

* रब्बी पीक पेरा डाऊनलोड करा

* महाडीबीटी 01 नोव्हंबर सोडत यादी पहा

error: Content is protected !!