Onion Subsidy : या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार कांदा अनुदान | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रु.३५० प्रति क्विंटल अनुदान देणेबाबत | शासन निर्णय 07 नोव्हेंबर 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

राज्यातील कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक २७ मार्च २०२३ नुसार अनुदान (Onion Subsidy) मंजूर करण्यासाठी सन २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या रू.५५० कोटी अक्षरी रूपये पाचशे पन्नास कोटी फक्त) या रकमेपैकी रू.८४ कोटी ०१ लाख (रू.चौ-याऐंशी कोटी, एक लाख फक्त) इतकी उर्वरित रक्‍कम वितरीत करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहेत्यानुसार दि.०१/११/२०२३ च्या शासन निर्णयातील प्रस्तावनेत व शासन निर्णयातील परिच्छेद २.१ मध्ये पुढीलप्रमाणे नमूद केले आहे.

 

Onion Subsidy

 

“जिल्हा निबंधक सहकारी संस्था, जि.धाराशीव अहवालानुसार, कृषि उत्पन्न बाजार समिती- परांडा, जि.धाराशीव यांच्या कार्यक्षेत्रातील तांत्रिक बाबींमुळे नाकारण्यात आलेल्या ४५९० लाभार्थ्यांना अद्याप कोणतेही अनुदान वितरीत झाले नसल्याने सदर पात्र लाभार्थ्यांना संपूर्ण १०० टक्के प्रमाणे अनुदानाची आवश्‍यक रक्कम रू.१५ कोटी ४१ लाख,३४ हजार ७७१ ( रू.१५,४१,३४,७७१/-) सर्व प्रथम अदा (Onion Subsidy) करण्यात यावी”.

 

 

२. शासन निर्णय दि. ३०.०८.२०२३ अन्वये प्रथम टप्प्यात रू. १०.०० कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी (Onion Subsidy) असलेल्या १४ जिल्हयातील पात्र लाभार्थ्यास संपूर्ण अनुदान व उर्वरित १० जिल्हयातील लाभार्थ्यांना रू.१०,०००/- इतक्या मर्यादेत अनुदान वितरणाचा तसेच शासन पत्र दिनांक १५.०९.२०२३ अन्वये दुस-या टप्प्यात सदर १० जिल्हयातील लाभार्थ्यांना अजून रू.१०,०००/- इतक्या मर्यादेत अनुदान वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

जिल्हा-धाराशिव (उस्मानाबाद) या जिल्ह्यातील कांदा अनुदानाची (Onion Subsidy) एकत्रित मागणी रु.१० कोटी पेक्षा जास्त असल्याने समक्रमांक दिनांक ३०.०८.२०२३ शासन निर्णय व दिनांक १५.०९.२०२३ च्या शासन पत्रातील तरतूदीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा येथील शेतक-यांना अनुदान वितरित करणे आवश्‍यक आहे. उपरोक्त बाब विचारात घेवून शासन निर्णय दिनांक ०१.११.२०२३ मधील परिच्छेद २.१ मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

 

 

जिल्हा निबंधक सहकारी संस्था, जि.धाराशीव अहवालानुसार, कृषि उत्पन्न बाजार समिती- परांडा, जि.धाराशीव यांच्या कार्यक्षेत्रातील तांत्रिक बाबींमुळे नाकारण्यात आलेल्या ४५९० लाभार्थ्यांना अद्याप कोणतेही अनुदान वितरीत झाले नसल्याने शासन निर्णय दिनांक ३०.०८.२०२३ व शासन पत्र दिनांक १५.०९.२०२३ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार ज्या लाभार्यांच्या अनुदानाची रक्‍कम रु.२०,०००/- व त्यापेक्षा कमी आहे त्यांना संपुर्ण अनुदान तसेच ज्या लाभार्भांच्या अनुदानाची रक्‍कम रु.२००००/- पेक्षा जास्त आहे त्यांना कमाल रु.२०,०००/- इतक्या मर्यादेत अनुदान वितरित करण्यात यावे.

 

कांदा अनुदान शासन निर्णय  (Onion Subsidy GR)

 

शासन निर्णय : डाऊनलोड करा

 

अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

* रब्बी पीक पेरा डाऊनलोड करा

* महाडीबीटी 01 नोव्हंबर सोडत यादी पहा

* “या” तीन जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!